रिलायन्स जिओने गेल्या वर्षी आपला पहिला 4G Android स्मार्टफोन लॉंच केला होता. JioPhone Next स्मार्टफोन गेल्या वर्षी रिलायन्सच्या ४४ व्या रिलायन्स एजीएम परिषदेत लॉंच करण्यात आला होता. हा फोन कंपनीने ६,४९९ रुपयांना उपलब्ध करून दिला आहे. परंतु ग्राहक ईएमआयवर २,००० रुपये डाउन पेमेंट देऊन फोन खरेदी करू शकतात. पण, आता तुम्हाला Jio चा हा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर एक चांगली संधी आहे. अमेझॉन इंडिया या ई-कॉमर्स वेबसाइटवर कमी किमतीत फोन खरेदी करता येईल.
JioPhone Next स्मार्टफोन सध्या Amazon वर ४,३२४ रुपयांना लिस्ट झाला आहे. याशिवाय सिटीबँक कार्ड ऑफरमुळे हँडसेटची किंमत आणखी कमी झाली आहे. Reliance Jio Phone Next हा स्मार्टफोन Citibank क्रेडिट कार्डवर घेतल्यास १० टक्के झटपट सूट (रु. १,५०० पर्यंत) मिळेल.
लॉंचच्या वेळी फोन ६,४९९ रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला होता. पण लॉंचच्या वेळी ते १,९९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध होते आणि बाकीचे पैसे देण्यासाठी EMI प्लॅन ऑफर करण्यात आले होते.
आणखी वाचा : Airtel चा ९१२ GB डेटाचा प्लॅन माहितेय? १ वर्षाचा रिचार्ज आणि अनलिमिटेड कॉल्स, फ्री हॉटस्टार
Jio Phone Next Specifications
JioPhone Next स्मार्टफोनमध्ये ५.४५ इंचाची HD+ स्क्रीन आहे. फोनमध्ये २ GB रॅम आणि ३२ GB इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये PragatiOS देण्यात आला आहे, जो खास JioPhone साठी Google च्या भागीदारीमध्ये बनवला गेला आहे.
JioPhone Next स्मार्टफोन Android 11 सह येतो. या स्वस्त 4G स्मार्टफोनमध्ये हिंदी, गुजराती, बंगाली इत्यादी अनेक स्थानिक भाषा देण्यात आल्या आहेत. Jio च्या या एंट्री-लेव्हल फोनमध्ये JioSaavn, MyJio, JioTV, JioCinema इत्यादी अॅप्स प्री-इंस्टॉल केलेले आहेत. याशिवाय गुगलचे सर्व अॅपही फोनमध्ये उपलब्ध आहेत. जिओच्या या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २१५ प्रोसेसर उपलब्ध आहे.