मुकेश अंबानीच्या मालकी असलेल्या टेलिकॉम कंपनी जिओचे भरपूर वापरकर्ते आहेत. जिओ नेहेमी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन्स सादर करत असते. नुकतीच कंपनीने ४ जी फीचर फोन रिचार्जची एक लांबलचक यादी सादर केली आहे. ज्यात मोफत व्हॉईस कॉल, ४ जी इंटरनेट, मोफत एसएमएस तसंच लाइव्ह टीव्ही, न्यूज, मूव्हीज इत्यादी जिओ ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे. जर तुम्ही देखील जिओचे ग्राहक असाल , तर तुम्ही देखील या प्लॅनसच्या फायदा घेऊ शकता.
सर्वोत्तम जिओ फोन रिचार्ज योजना
पूर्वीच्या तुलनेत, जिओने आता ४ जी फीचर फोन वापरकर्त्यांसाठी एकूण सात जिओ फोन रिचार्ज योजना ऑफर सादर केली आहे. हे चार पॅक २८ दिवसांच्या वैधतेसह येतात, तर त्यापैकी दोन २३ दिवसांच्या वैधतेसह येतात. सर्वात महाग जिओ फोन रिचार्ज प्लॅन तुम्हाला ३३६ दिवसांची वैधता देतो. सर्व रिचार्ज पॅक विनामूल्य व्हॉइस कॉल आणि एसएमएससह उपलब्ध आहे . याशिवाय जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउड ॲप्स सर्व प्लॅनसह मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
१) जिओ फोन ७५ रुपयांचा रिचार्ज
जिओ फोन ग्राहकांसाठी हा सर्वात स्वस्त आणि मूलभूत रिचार्ज प्लॅन आहे. ही योजना केवळ २३ दिवसांच्या वैधतेसह येते. या योजनेत २.५ जीबी डेटा, विनामूल्य व्हॉइस कॉल आणि ५० एसएमएस उपलब्ध आहेत. तसंच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज या ॲप्सना या प्लॅनसोबत मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
२ ) जिओ फोन ९१ रुपयांचा रिचार्ज
या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या जिओ फोन रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण ३ जीबी डेटा , मोफत व्हॉइस कॉल आणि ५० मेसेजचा लाभ मिळतो. त्याच वेळी,जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज या ॲप्सना या प्लॅनसोबत मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
३ ) जिओ फोन १२५ रुपयांचा रिचार्ज
जिओ फोनच्या या रिचार्जमध्ये २३ दिवसांची वैधता उपलब्ध आहे. त्याच वेळी, ह्या जिओ फोन प्लॅनमध्ये एकूण ११.५ जीबी डेटा तसंच ३०० मेसेजची सुविधा उपलब्ध आहे .तसंच हा प्लॅन फ्री व्हॉईस कॉलसह दिला जातो.
४) १५२ रुपयांचा जिओ फोन रिचार्ज
१२५ रुपयांच्या Jio फोन रिचार्ज प्लॅनमध्ये, ग्राहकांना एकूण १४ जीबी हाय-स्पीड डेटा तसंच ३०० एसएमएस २८ दिवसांच्या वैधतेसह मिळतात. या योजनेमधील देखील मोफत अमर्यादित व्हॉइस कॉलचा फायदा उपलब्ध आहे.
५) जिओ फोन १८६ रुपयांचा रिचार्ज
जिओ फोनच्या १८६ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा, मोफत व्हॉइस कॉल, १०० एसएमएस आणि जिओ ॲप्सना मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
६) जिओ फोन २२ रुपयांचा रिचार्ज
जिओ फोन रिचार्ज पॅकची किंमत २२२ रुपये आहे. २८ दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा उपलब्ध आहे. त्यानुसार प्लॅनमध्ये युजर्सना एकूण ५६ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय प्लॅनमध्ये ग्राहकांना १०० एसएमएस , अमर्यादित मोफत व्हॉईस कॉल्स आणि जिओ ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
७) जिओ फोन ८९९ रुपयांचा रिचार्ज
सर्वात महाग जिओ फोन रिचार्ज प्लॅन आता तुम्हाला जास्त महागात पडेल. अलीकडेच कंपनीने या प्लानच्या किमतीत १५० रुपयांनी वाढ केली होती. यापूर्वी या प्लानची किंमत ७४९ रुपये होती. पण, आता या रिचार्जसाठी ग्राहकांना ८९९ रुपये मोजावे लागणार आहेत. या पॅकमध्ये ग्राहकांना एकूण ३३६ दिवसांच्या वैधतेसह दर २८ दिवसांनी २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना एकूण २४ जीबी डेटा दिला जातो
JioPhone डेटा व्हाउचर
१) JioPhone २२ रुपयांचा प्लॅन
जिओचा २६ रुपयांचा २८ दिवसांच्या संपूर्ण वैधतेसह आणि २ जीबी डेटासह येतो. याशिवाय या योजनेत कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही.
२) JioPhone ६२ रुपयांचा प्लॅन
या रिचार्जमध्ये एकूण ६ जीबी डेटा उपलब्ध आहे. याशिवाय या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे.
३) JioPhone ८६ रुपयांचा प्लॅन
हा प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसह दररोज ०.५ जीबी डेटासह मिळतो. याशिवाय या योजनेत कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही.
४) JioPhone १२२ रुपयांचा प्लॅन
हा प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये दररोज १ जीबी डेटा ग्राहकांना मिळतो.
५) JioPhone १८२ रुपयांचा प्लॅन
हे जिओचे सर्वात महागडे डेटा व्हाउचर आहे. या प्लॅनमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह दररोज २ जीबी डेटा ग्राहकांना उपलब्ध होतो.