Jio Prepaid plan: जिओ ग्राहकांसाठी एकापेक्षा जास्त प्लॅन ऑफर करते आणि ग्राहक त्यांच्या सोयीनुसार रिचार्ज करतात. इंटरनेटचा वापर हळूहळू वाढत आहे, आणि अशा परिस्थितीत, जर तुम्ही असा प्लॅन शोधत असाल ज्यामध्ये दररोज अधिक डेटा दिला जाईल, तर जिओ असा एक उत्तर प्लॅन ऑफर करतो. हा प्लॅन आहे ४९९ रुपयांचा, ज्यामध्ये २ जी.बी. डेटा दररोज दिला जातो. जाणून घेऊया या योजनेची संपूर्ण माहिती…

जाणून घ्या प्लॅनचा पूर्ण तपशील

जिओच्या या स्वस्त प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता दिली जाते. विशेष म्हणजे २८ दिवसांसाठी ग्राहक दररोज २ जी.बी. डेटाचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय ग्राहकांना ४९९ रुपयांचा रिचार्ज करून अमर्यादित व्हॉईस कॉलिंगचा लाभ मिळू शकतो, एवढेच नाही तर ग्राहकांना दररोज १०० एसएमएसही दिले जातात.

अतिरिक्त फायदे काय आहेत?

४९९ रुपयांच्या या प्लॅनच्या अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना यामध्ये Disney + Hotstar चे एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते, ज्याची किंमत ४९९ रुपये आहे. याशिवाय वापरकर्त्यांना जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ सिक्युरिटी यांसारख्या सर्व जिओ अॅप्समध्ये प्रवेश मिळतो.

हा १.५ जी.बी डेटासह एक प्लॅन आहे: रिलायन्स जिओकडे ३० दिवसांच्या वैधतेसह एक प्लॅन देखील आहे. जिओच्या २५९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज १.५ जी.बी डेटा दिला जातो. दैनंदिन डेटा संपल्यानंतर त्याची गती ६४Kbps होते. रिलायन्स जिओ दैनंदिन डेटा फायद्यांसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह येतो. याशिवाय वापरकर्त्यांना दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचा मोफत प्रवेश देखील दिला जातो. हा प्लॅन १ महिन्याच्या वैधतेसह येतो.

Story img Loader