Top 4 Jio recharge plans : एखाद्याला घरबसल्या पैसे पाठवण्यापासून ते अगदी वीज बिल भारण्यापर्यंत आपण सगळेच स्मार्टफोनचा वापर करतो. पण, ही सगळी काम करण्यासाठी मोबाईलमध्ये नेट हवं असतं. तर यासाठी ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन वोडाफोन, एअरटेल, जिओ कंपन्या रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. तर या कंपन्यांनी ऑफर केलेल्या रिचार्ज प्लॅनमध्ये (Jio recharge plans) स्वस्त कोणता प्लॅन आहे? प्लॅन किती दिवसांसाठी वैध आहे? प्लॅनबरोबर कोणते सबस्क्रिप्शन मोफत मिळणार? आदी अनेक गोष्टी आपण बघतो. जर तुमच्याकडे जिओचं कार्ड असेल तर या चार रिचार्ज प्लॅन्सची (Jio reacharge plans) यादी एकदा नक्की बघा…

१९८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन :

जिओच्या १९८ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ( Jio Recharge Plan) तुम्हाला अमर्यादित ५जी डेटा, महिन्याला २८जीबी डेटा दिला जाईल ; जो १४ दिवसांसाठी वैध असणार आहे. या प्लॅनमध्ये १०० मोफत एसएमएससह आणि दररोज २जीबी डेटा दिला जाईल. तसेच या पॅकबरोबर कंपनी जिओ ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील ऑफर करते आहे.

४४८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन :

हा प्लॅन २८ दिवसांसाठी वैध आहेत आणि तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह एकूण ५६ जीबी डेटा आणि दररोज २जीबी डेटा देईल. तुमच्या परिसरात ५जी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असल्यास, तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय अमर्यादित ५जी कनेक्शन वापरू शकता. या रिचार्ज प्लॅनसह तुम्हाला सोनी लिव्ह आणि झी ५ चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाईल.

हेही वाचा…गाणं ऐकताना सतत ॲड्स येतात? YouTube ने शोधला उपाय; आता pause न करता व्हिडीओ बघा

१०२८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन :

जिओच्या प्लॅनसह ग्राहकांना अमर्यादित ५जी डेटा दिला जाईल. हा प्लॅन ८४ दिवसांसाठी वैध असून महिन्याला १६८ जीबी डेटा देईल. म्हणजेच तुम्ही दररोज २ जीबी डेटा वापरू शकता. रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह, दररोज १०० विनामूल्य एसएमएस दिले जातील. याचबरोबर जिओ ग्राहकांना स्विगी ॲपचे सबस्क्रिप्शन देखील देते.

१०२९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन :

हा प्लॅन ग्राहकांना अमर्यादित ५जी डेटा प्लॅन देतो आहे.यामध्ये तुम्हाला दररोज २जीबी डेटा दिला जाईल ; ज्याची वैधता ८४ दिवस असेल. त्याचप्रमाणे ओटीटी स्ट्रीमिंगसाठी, नंतर तुम्हाला ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) चे सबस्क्रिप्शन मिळेल ; जे ८४ दिवसांसाठी वैध असेल. तर तुमच्यासाठी कोणता प्लॅन बेस्ट ( Jio recharge plans) आहे ते ठरवा आणि त्याप्रमाणे मोबाईलमध्ये रिचार्ज करा.