Jio 3599 Rupees Recharge Plan : भारतात जिओने एन्ट्री केल्यानंतर युजर्सचा स्मार्टफोन वापरण्याच्या पद्धतीत प्रचंड बदल झाला. जिओ रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणारे अतिरिक्त फायदे ग्राहकांना आकर्षित करू लागले आणि त्यामुळे अनेक जण जिओचे सिम खरेदी करू लागले. आता ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन रिचार्ज प्लॅन सादर करणाऱ्या कंपनीने पुन्हा एकदा सगळ्यांची मने जिंकली आहेत आणि ९१२ जीबी डेटा देणारा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. तर या प्लॅनचा तुम्हाला कसा फायदा होणार जाणून घेऊ…
रिलायन्स जिओने त्यांच्या ४६ कोटींहून अधिक युजर्सना मोठा दिलासा दिला आहे, ज्यामुळे त्यांचे सिम वर्षभर ॲक्टिव्ह राहते. वारंवार रिचार्ज करून कंटाळलेल्या युजर्ससाठी, जिओची नवीन ऑफर एका रिचार्जसह ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी देते. ३,५९९ आणि ३,९९९ रुपयांच्या किमतीचे दोन वार्षिक रिचार्ज प्लॅन लाँच केले गेले आहेत. त्यापैकी एका प्लॅनची माहिती जाणून घेऊ…
३,५९९ रुपयांच्या जिओचा रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan)
या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, भरपूर डेटा व ओटीटी सबस्क्रिप्शनचा समावेश आहे. ३,५९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये संपूर्ण ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. युजर्सना सर्व नेटवर्कवर अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉल, दररोज १०० एसएमएस व ९१२ जीबी हाय-स्पीड डेटा, जो दररोज २.५ जीबी वापरता येईल. दररोज डेटा मर्यादा संपल्यानंतर, वेग ६४ केबीपीएसपर्यंत कमी होतो. त्यात जिओच्या ट्रू ५जी सेवांचा प्रवेश (Jio’s True 5G services)देखील समाविष्ट आहे.
जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ओटीटी फायदे आणि क्लाउड स्टोरेजसुद्धा दिलेले आहे. युजर्सना जिओसिनेमा प्रीमियम (हॉटस्टार)चे ९० दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन, ज्यामुळे त्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय चित्रपट, खेळ आणि वेब सीरिजचा आनंद घेता येतो. त्याव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये ५० जीबी जिओ एआय क्लाउड स्टोरेज आणि जिओटीव्हीचा मोफत प्रवेशसुद्धा देण्यात आला आहे, ज्यामुळे मनोरंजनाचा अनुभव आणखीन खास होईल. हा प्लॅन जिओ युजर्ससाठी खास असल्याचे म्हटले जाते, ज्यांना जास्त डेटाची आवश्यकता आहे.