Reliance Jio New Plan: तुम्हीही रिलायन्स जिओचा प्रीपेड नंबर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, काही महिन्यांपूर्वी Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea ने त्यांच्या मोबाईल रिचार्जचे दर वाढवले ​​होते. त्यावेळी मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स जिओने आपल्या अनेक प्लॅनच्या किंमती बदलल्या होत्या.पण आता दरवाढीनंतर जिओनं पुन्हा एकदा युजर्सना आणखी एक धक्का दिला आहे. जिओच्या युजर्सना मर्यादित डेटासह अनलिमिटेड कॉलिंगचे व्हॅल्यू प्लॅन्स आता मिळणार नाहीत. जिओ कंपनी डेटासह तीन व्हॅल्यू प्लॅन्स ऑफर करत होती. पण, आता हे तीन प्लॅन्स बंद करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हे’ तीन प्लॅन्स बंद

१. जिओ युजर्सला यापुढे रिचार्ज करता येणार नाही, अशा प्लॅन्सच्या यादीतील पहिला प्लॅन १८९ रुपयांचा आहे. रिचार्जवर २८ दिवसांच्या वैधतेसह एकूण २GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळत होते, या प्लॅनमध्ये ३०० SMS पाठवण्याचा पर्याय दिला जात होता.

२. याशिवाय ४७९ रुपयांच्या दुसऱ्या प्रीपेड प्लॅनमध्ये ८४ दिवसांच्या वैधतेसह ६GB डेटा मिळत होता आणि ग्राहक अनलिमिटेड कॉलिंग व्यतिरिक्त १००० SMS पाठवू शकत होते.

३. तिसरा व्हॅल्यू प्लॅन १८९९ रुपयांचा होता, ज्याची वैधता ३३६ दिवसांची होती. सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग व्यतिरिक्त एकूण २४GB डेटा दिला जात होता आणि ३६०० SMS पाठवता येत होते. या सर्व प्लॅनमध्ये जिओ अ‍ॅप्सचा (जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊड) अ‍ॅक्सेस मिळत होता. आता युजर्सकडे मर्यादित डेटा असलेल्या या प्लॅन्ससोबत रिचार्ज करण्याचा पर्याय नाही.

जिओ युजर्संना हा प्लॅन फायदेशीर ठर शकतो

‘हिरो 5G’ प्लॅन असे नाव दिले आहे. सर्वात कमी किमतीचा अनलिमिटेड 5G प्लॅन असलेल्या ३४९ रुपयांच्या प्लॅनसोबतही हे नाव शेअर करण्यात आले आहे. रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये पूर्वीप्रमाणेच रोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळते. म्हणजेच तुम्हाला हवं तेवढं बोलून रोज १०० SMS पाठवू शकता. यामध्ये एअरटेलचा ९७९ रुपयांचा प्लॅनही जिओच्या मागे नाही, ज्यामध्ये युजर्सलाही त्याच सुविधा मिळतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio removed three value recharge plans with limited data see more details srk