दूरसंचार विभागाने (DoT) रिलायन्स जिओच्या सॅटेलाइट युनिटला मान्यता दिली आहे. DoT ने कंपनीला लेटर ऑफ इंटेंट (LOI) देखील जारी केले आहे. आता जीओ लवकरच भारतात ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशन सॅटेलाइट (GMPCS) सेवा जारी करू शकते. तसेच जीओ इंटरनेट सेवांसह व्हॉईस सेवा देखील जारी करेल, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
याआधी सॅटेलाइट इंटरनेट कंपनी ह्यूजेस कम्युनिकेशनने इस्रोच्या मदतीने भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्याची घोषणा केली आहे. वास्तविक, रिलायन्स जिओने गेल्या महिन्यातच दिवाळीपर्यंत देशातील प्रमुख शहरांमध्ये ५ जी कनेक्टिव्हिटी सुरू करण्याची घोषणा केली होती. कंपनीने सांगितले होते की, २०२३ च्या अखेरीस संपूर्ण भारत ५ जी कनेक्टिव्हिटीने जोडला जाईल. आता जीओ दूरसंचार विभागाच्या परवानगीने, जीओ सॅटेलाइट इंटरनेटवर जलद काम करू शकते. रिलायन्स जिओचे सॅटेलाइट युनिट ज्या भागांसाठी परवाना आहे, त्या भागात सॅटेलाइट सेवा सोडू शकते.
(आणखी वाचा : जीओ, व्हीआय, एअरटेल, बीएसएनएल आणि एमटीएनएल कंपन्या ऑफर करणार ३० दिवसांचा प्लॅन; ट्रायने जारी केली यादी )
यामध्ये डेटा तसेच व्हॉइस सेवांचा समावेश असेल. जीओचे उपग्रह युनिट Jio Satellite Communication Limited (JSCL) म्हणूनही ओळखले जाते. हे मोबाईल सॅटेलाइट नेटवर्क लो-अर्थ ऑर्बिट, मीडियम-अर्थ ऑर्बिट व्यतिरिक्त जियोसिंक्रोनस सॅटेलाइटसोबत कार्य करेल. या वर्षी फेब्रुवारीमध्येच, जिओने सॅटेलाइट इंटरनेटसाठी जगभरातील सॅटेलाइट -आधारित कनेक्टिव्हिटी कंपनी SES सोबत भागीदारी केली आहे, ज्यामध्ये Jio Platforms आणि एसईएसचे संयुक्त उपक्रमात अनुक्रमे ५१ टक्के आणि ४९ टक्के इक्विटी स्टेक असतील.
ह्यूजेसने सॅटेलाइट इंटरनेटची घोषणा केली
जिओपूर्वी सॅटेलाइट इंटरनेट कंपनी ह्यूजेसने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) मदतीने भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्याची घोषणा केली आहे. Hughes Communications आणि India ISRO च्या GSAT-११ आणि GSAT-२९ कम्युनिकेशन सॅटेलाइटच्या मदतीने सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवणार आहे. यामुळे देशभरात हायस्पीड सॅटेलाइट आधारित इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
(आणखी वाचा : आता स्मार्टफोन खरेदी करा स्मार्ट पद्ध्तीने; जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी… )
सॅटेलाइट इंटरनेट कसे कार्य करते
सॅटेलाइट इंटरनेट वायर्सऐवजी लेझर बीम वापरून अवकाशातून डेटा ट्रान्सफर केला जातो. लेसर सिग्नल चांगला असण्यासाठी, एक सॅटेलाइट जवळपासच्या आणखी चार सॅटेलाइटशी संवाद साधतो. मग ते सॅटेलाइट इतर चार सॅटेलाइटशी जोडले जातात.
अशा प्रकारे आकाशात सॅटेलाइटचे जाळे तयार होते, जे जमिनीवर हायस्पीड इंटरनेट पुरवते. म्हणजेच सॅटेलाइट इंटरनेटचा वेग ब्रॉडबँडपेक्षा जास्त आहे आणि ज्या भागात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी नाही किंवा इंटरनेट स्पीडची समस्या आहे अशा भागातही ते इंटरनेट कनेक्टिव्हिटीशी जोडले जाऊ शकते.