Jio Welcome Offer: देशात नुकतीच 5G सेवा लाँच झाली असून रिलायन्स जीओची 5G सेवा गेल्या महिन्यातच लाँच झाली आहे. जीओने देशातील महत्वाच्या शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध करून दिली आहे. Jio True 5G सेवा येण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे 5G सेवा ही काही निवडक ग्राहकांसाठीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. जीओ वापरकर्त्यांसाठी आता कंपनीने भन्नाट ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांना मोफत 5G नेटवर्क दिले जाऊ शकते. काही निवडक वापरकर्त्यांना यासंदर्भात इन्विटेशन देण्यात आले आहे.

5G सेवा रिलायन्स जीओने गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर २०२२ मध्ये लाँच केली होती. ही सेवा यापूर्वी देशातील निवडक शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. Jio चा True 5G सध्या बीटा टप्प्यात आहे. यामुळेच 5G निवडक युजर्सना फक्त Invite द्वारे उपलब्ध करून दिले जात आहे.

Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
PAN 2 0 is going Digital Will you still need a physical PAN card as ID proof and KYC document
PAN 2.0 आता डिजिटल होणार: अजूनही फिजिकल PAN कार्डची गरज भासेल का?
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा

जीओची 5G सेवा ‘या’ शहरांमध्ये उपलब्ध

सध्या रिलायन्स जीओने भारतातील फक्त आठ शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये दिल्ली एनसीआर, वाराणसी, कोलकाता, बेंगळुरू, मुंबई, चेन्नई, नाथद्वारा आणि हैदराबादचा समावेश आहे. जीओने या शहरांतील ग्राहकांसाठी वेलकम ऑफर आणली आहे. तथापि, जिओ वेलकम ऑफर केवळ निवडक वापरकर्त्यांसाठी आहे.

(आणखी वाचा : खुशखबर: iPhone 12 मिळतोय एवढ्या स्वस्तात; तुम्ही पण म्हणाल, ‘आता घेऊनच टाकतो’ लगेच ऑफर डिटेल्स पाहा!)

जीओ वेलकम ऑफर ‘या’ निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध

जीओ वेलकम ऑफर कंपनीकडून अशा वापरकर्त्यांना दिली जात आहे ज्यांच्याकडे Jio 5G-नेटवर्क कंपॅटिबल डिव्हाइस आहे. तसेच, ते 5G-नेटवर्क कव्हरेज क्षेत्रात देखील आले पाहिजेत. पात्र वापरकर्त्यांना त्यांच्या जीओ नंबरवर २३९ रुपये किंवा त्याहून अधिकचा सक्रिय प्लॅन घ्यावा लागेल. ऑफर अंतर्गत, ग्राहकांना १Gbps पर्यंतच्या स्पीडसह अमर्यादित 5G डेटा मिळेल.

Jio 5G मोफत कसे मिळवाल?

  • जीओ वेलकम ऑफर निवडक वापरकर्त्यासाठीच उपलब्ध आहे. यासाठी युजर्सना नवीन सिम कार्ड घेण्याची गरज नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. म्हणजेच, जर तुमच्या प्रीपेड किंवा पोस्टपेड सिमवर २३९ रुपयांपेक्षा जास्त रिचार्ज असेल तर तुम्हाला 5G सेवा मिळू शकते.
  • जीओने पाठवलेली आमंत्रणे पाहण्यासाठी तुम्ही My Jio अॅपवर जाऊ शकता. तुम्ही निवडलेल्या शहरात राहता आणि तुमच्याकडे जिओ सिम असेल तर तुम्ही My Jio अॅपमध्ये आमंत्रण तपासू शकता. मात्र, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे 5G सपोर्ट असलेला फोनही असणे आवश्यक आहे.
  • अधिक शहरांमध्ये 5G सादर केल्यानंतर, कंपनी नवीन योजना लाँच करू शकते. तोपर्यंत वापरकर्ते विनामूल्य 5G वापरू शकतात. सेवा वापरण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये n28, n78, n258 बँड असणे आवश्यक आहे.

Story img Loader