Jio Or Airtel Cheapest prepaid mobile 5G plan from Jio: अलीकडेच जिओ (Jio), एअरटेल (Airtel) या भारतीय दूरसंचार ऑपरेटर्सनी त्यांच्या मोबाइल प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. ३ जुलैपासून या दूरसंचार कंपन्यांनी सर्व मोबाइल रिचार्ज प्लॅनच्या किमतीत २५ टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे; ज्यामुळे प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही युजर्सच्या खिशाला फटका बसला आहे. मोबाइल प्लॅन किमतीच्या वाढीसह, जिओ आणि एअरटेलने (Jio vs Airtel)५जी ​​इंटरनेट गतीच्या उपलब्धतेवर निर्बंध जाहीर केले आहेत. सध्या ५जी सेवा ऑफर करणाऱ्या ऑपरेटर्सनी घोषणा केली आहे की, ५जी डेटा केवळ २जीबी दैनिक डेटा किंवा त्याहून अधिक ऑफर करणाऱ्या योजनांमध्ये उपलब्ध असेल.

Jio Or Airtel : तर, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जिओ (Jio) किंवा एअरटेल (Airtel ) मधील आताचा सर्वात स्वस्त ५ जी प्रीपेड डेटा प्लॅन कोणता आहे? दोन्ही दूरसंचार कंपन्यांकडे ५जी डेटा प्लॅन आहे. तर किंमत, वैधता, डेटा, सबस्क्रिप्शन यावर लक्ष केंद्रित करून, आपण जिओ आणि एअरटेलच्या स्वस्त ५जी प्लॅनबद्दल या लेखातून सविस्तर चर्चा करूया.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
elon musk internet on mars
एलॉन मस्क मंगळावर पोहोचवणार इंटरनेट सेवा? कारण काय? त्याचा फायदा कोणाला?
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल

हेही वाचा…आता शोधाशोध करण्याची गरज नाही; व्हॉट्सॲप आणतयं Context Card; कोणी ग्रुपमध्ये का ॲड केलं हे मिनिटांत कळणार

जिओचा सगळ्यात स्वस्त ५जी मोबाइल प्लॅन (Cheapest prepaid mobile 5G plan from Jio) :

रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त ५ जी मोबाइल प्लॅन फक्त ३४९ रुपयांचा आहे. हा प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसह येतो आणि एकूण ५६ जीबी डेटा प्रदान करतो. म्हणजेच युजर्स दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटाचा आनंद घेऊ शकतात. याव्यतिरिक्त, प्लॅनमध्ये ५जी हाय-स्पीड इंटरनेट वापरण्याची परवानगी देते. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज १०० एसएमएस आणि जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊडचं फ्री सब्स्क्रिप्शन आदींचा समावेश आहे. पण, ही बाब लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, JioCinema सबस्क्रिप्शनमध्ये JioCinema प्रीमियम समाविष्ट नाही; याचा अर्थ काही प्रीमियम सामग्री या प्लॅन अंतर्गत प्रवेश करण्यायोग्य असू शकत नाही.

एअरटेलचा सगळ्यात स्वस्त ५जी मोबाइल प्लॅन (Cheapest prepaid mobile 5G plan from Airtel) :

एअरटेलच्या सर्वात स्वस्त ५जी प्लॅनची ​​किंमत ३७९ रुपये आहे. हा प्लॅन एक महिन्याची वैधता प्रदान करतो आणि २६३ जीबी डेटा प्रदान करतो. म्हणजेच युजर्सना दररोज अंदाजे ८.५ जीबी डेटा दिला जाईल. प्लॅनमध्ये अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्ससह दररोज १०० एसएमएसदेखील समाविष्ट आहेत. एअरटेल या प्लॅनसह अतिरिक्त फायदेदेखील देते. जसे की, अमर्यादित ५जी डेटा, जो प्लॅनच्या डेटा मर्यादेच्या पलीकडे ५ जी नेटवर्क भागात वापरला जाऊ शकतो. वापरकर्त्यांना एक विनामूल्य हॅलोट्यूनदेखील मिळतो, ज्यामुळे त्यांना कोणतेही गाणे कॉलर ट्यून म्हणून सेट करण्याची परवानगी मिळते. याव्यतिरिक्त, वापरकर्ते एअरटेलच्या विंक म्युझिकचा आनंद घेऊ शकतात.

हेही वाचा…Airtel Announces Mobile Tariff Hike: जिओ मागोमाग एअरटेलचीही मोबाइल सेवा महागली! २८ दिवस ते एक वर्षाच्या प्लॅन्ससाठी ‘असे’ आहेत नवे दर

तर कोणती कंपनी ऑफर करतेय सगळ्यात स्वस्त प्लॅन ?

तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही यातील एका कंपनीच्या प्लॅनची निवड करू शकता. कारण जिओ आणि एअरटेल दोन्हीही कंपन्या ५जी प्रीपेड प्लॅन्स वापरकर्त्यांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करतात. जिओचा प्लॅन थोडा स्वस्त आहे आणि जिओ टीव्ही , जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडसारख्या अत्यावश्यक सबस्क्रिप्शनसह येतो. याउलट एअरटेलचा प्लॅन जास्त डेटा, मोफत हॅलोट्यून आणि Wynk Music वर प्रवेश देते. तसेच याव्यतिरिक्त एअरटेलचा ३४९ रुपयांचा प्लॅन १.५ जीबी डेटा प्रदान करते.