देशामध्ये सध्या Reliance Jio , VI आणि Airtel या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. त्यापैकी जिओ आणि एअरटेल या कंपन्यांनी काही प्रमुख शहरांमध्ये आपली ५ जी सेवा सुरु केली आहे. या टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करत असतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग , १०० एसएमएस दररोज आणि अनेक ऑफर्स तुम्हाला देत असतात. प्रत्येक कंपनीकडे तुमच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे प्लॅन्स असतात. आज आपण Jio- VI-Airtel या कंपन्यांकडे असणाऱ्या प्रीपेड प्लॅन्सची तुलना करणार असून यामध्ये दररोज २ जीबी डेटा मिळणाऱ्या प्लॅनमध्ये कोणता प्लॅन निवडावा हे जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Vodafone Idea

दररोज २ जीबी डेटा वापरायला मिळतो. या प्लॅनची किंमत त्याची वैधता किती आहे यावर अवलंबून असते. वोडाफोन-आयडियाच्या प्लॅनबद्दल विचार केल्यास या प्लॅनमध्ये २ जीबी दररोजचा डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस दररोज असे ऑफर करतात. या मध्ये या कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन हा ३१९ रुपये असून त्याची वैधता आहे.

हेही वाचा : Apple Store: २० एप्रिलला दिल्लीमधील ‘या’ मॉलमध्ये उघडणार अ‍ॅपलचे स्टोअर, जाणून घ्या कधीपासून करता येणार खरेदी

मात्र तुम्हाला अधिक वैधतेचा प्लॅन हवा असल्यास रुपये ५३९ आणि ८३९ रुपयांचे प्लॅन येतात. ते अनुक्रमे ५६ आणि ८४ दिवसांसाठी वैध असतात. एक वर्षाच्या Disney+ Hotstar सबस्क्रिप्शनसह २ जीबी डेटा असा प्लॅन शोधात असाल तर तुम्ही १,०६६ रुपयांचा प्लॅन घेऊ शकता. ज्याची वैधता ८४ दिवस इतकी आहे.

Reliance Jio

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी दररोजचे २ जीबी डेटा असणारा प्लॅन ऑफर करते. यामध्ये २४९ रुपयांचा कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि त्याची वैधता २३ दिवसांसाठी आहे. तुम्हाला जास्त वैधतेचा प्लॅन हवा असल्यास २९९ ,५३३ आणि ७१९ रुपयांचा प्लानचा तुम्ही विचार करू शकता. ज्याची वैधता २३, ५६ आणि ८४ दिवसांची आहे.

Airtel

वरील टेलिकॉम कंपन्यांप्रमाणेच एअरटेल देखील दररोज २ जीबी डेटा वापरता येईल असे अनेक प्लॅन ऑफर करते. यामध्ये कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन हा ३१९ रुपयांचा आहे. ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि १ महिन्याच्या वैधतेसह येतो.जर तुम्हाला Airtel Xstream App मध्ये प्रवेश हवा असेल तर तुम्हाला ३५९ रुपयांचा प्लॅन घ्यावा लागेल. जास्त वैधतेचा प्लॅन हवा असल्यास ५६ दिवसांसाठी ५४९ रुपये आणि ८४ दिवसांसाठी ८३९ रुपयांचा प्लॅन तुम्हाला घ्यावा लागेल.

हेही वाचा : Salesforce मधून नोकरी गेल्यावर महिला कर्मचारी भावूक; पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “मला सुरुवातीला…”

Airtel vs Vi vs Jio: दररोज २ जीबी डेटासाठी कोणता प्लॅन सर्वोत्तम आहे ?

जर का तुम्हाला १ महिन्याच्या वैधतेचा प्लॅन हवा असेल तर, रिलायन्स जीओचा २९९ रुपयांच्या प्लॅनचा विचार करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळते. जर का तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करायचे नसल्यास जिओच्या काही पॉकेट फ्रेंडली ऑफर्स देखील आहेत. ज्यामध्ये तुम्ही ५३३ आणि ७१९ रुपयांचा अनुक्रमे ५६ आणि ८४ दिवसांच्या वैधता असलेला प्लॅन घेऊ शकता. तसेच तुम्हाला या प्लॅनमध्ये OTT प्लॅटफॉर्मचा वापर करायचा असेल तर तुम्ही वोडाफोनचा १,०६६ रुपयांच्या प्लॅनचा विचार करू शकता. जी तुम्हाला Disney+ Hotstar किंवा Airtel Xstream App सबस्क्रिप्शनसह येणार्‍या एअरटेलच्या ३५९ रुपयांच्या प्लॅनमध्ये एक वर्षासाठी प्रवेश घेता येतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio vs vi vs airtel 2 gb daily deta prepaid plan comparison ott platform basis recharge tmb 01
Show comments