Jio Yearly Plan Details In Marathi : रिलायन्स जिओने युजर्ससाठी वर्षभराचे रिचार्ज प्लॅन्स सादर करून, त्यांच्या रिचार्ज पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. या योजनांमुळे युजर्सचा नंबर वारंवार रिचार्ज करण्याचा वेळ आणि त्रास कमी होईल एवढाच कंपनीचा प्रयत्न आहे. तुम्ही आतापर्यंत २८ दिवस, ३० दिवस किंवा अगदी ८५ किंवा ९० दिवसांच्या रिचार्ज प्लॅनबद्दल वाचले असेल. पण, आज आम्ही तुम्हाला ३६५ दिवसांच्या जिओच्या रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जो जवळजवळ ९५० जीबी डेटासह येतो. वाचून थक्क झालात ना? तर तुम्हालाही हा रिचार्ज प्लॅन करायचा असेल; पण यात काय फायदे मिळतील, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा.

  • जिओच्या ३,९९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची अमर्यादित कॉलिंग, दिवसाला १०० एसएमएस, ९१२.५ जीबी डेटा व ३६५ दिवसांची वैधता ही वैशिष्ट्ये आहेत.
  • दिवसभर हाय स्पीडवर डेटा सुमारे २.५ जीबी इतका चालू शकतो. पण, विशिष्ट प्रमाणात डेटा वापरल्यानंतर स्पीड कमी होईल हेही लक्षात घ्या.
  • जिओ हॉटस्टार मोबाईल / टीव्ही सबस्क्रिप्शन ९० दिवसांसाठी मिळेल आणि त्याचबरोबर तुम्हाला मोफत ५० जीबी जिओ एआय क्लाउड स्टोरेजसुद्धा दिले जाईल.

जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन ही वन-टाइम आणि मर्यादित कालावधीची ऑफर आहे.

त्यामुळे जिओ मासिक योजनेच्या ग्राहकांना दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्याचा जिओ हॉटस्टार लाभ मिळविण्यासाठी प्लॅनची ​​मुदत संपल्यानंतर ४८ तासांच्या आत त्यांचा प्लॅन रिचार्ज करावा लागेल.

योजनेबरोबर ऑफरचा कसा फायदा घ्यायचा? (Jio Yearly Plan)

युजरला त्याच जिओ नंबरने जिओ हॉटस्टार / जिओ क्लाउडमध्ये लॉग इन करावे लागेल.

वार्षिक रिचार्ज प्लॅनबरोबर जर तुम्ही कमी कालावधीचा रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर जिओकडे २०० दिवसांचा प्लॅन आहे; ज्याची किंमत २,५०० रुपयांपेक्षा कमी आहे. त्याची माहिती खालीलप्रमाणे…

जिओच्या २,०२५ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि ५जी डेटा दिला जाईल. तसेच २०० दिवसांच्या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत २,०२५ रुपये आहे, ज्यामुळे तो उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम दीर्घकालीन ५जी प्लॅनपैकी एक बनतो. या प्लॅनसह युजर्सना दररोज १०० मोफत एसएमएस, ५०० जीबी हाय-स्पीड ५जी डेटा (२.५ जीबी/दिवस), दैनिक डेटा मर्यादा संपल्यानंतर अमर्यादित लो-स्पीड ब्राऊझिंग सुरू राहील. व्हिडीओ स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेमिंगचा आनंद घेणाऱ्यांसाठी हा प्लॅन भरपूर दैनिक डेटा वापरण्यास परवानगी देतो.

या रिचार्ज प्लॅनसह जिओ अनेक अतिरिक्त फायदेही देत आहे. त्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे, ज्यामध्ये जिओ टीव्ही, जिओ हॉटस्टार व एआय क्लाउड स्टोरेज यांचा समावेश आहे.

१. नवीन चित्रपट, वेब सीरिज पाहण्यासाठी जिओ हॉटस्टारचे ९० दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन.
२. फोन स्टोरेजची चिंता न करता, महत्त्वाच्या फाइल्स व फोटो साठवण्यासाठी ५० जीबी एआय क्लाउड स्टोरेज.
३. लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि स्पेशल कार्यक्रम स्ट्रीमिंगसाठी मोफत जिओ टीव्ही सबस्क्रिप्शन यांचा यामध्ये समावेश असणार आहे.