दिवाळीच्या तोंडावर जीओने आपल्या मनोरंजनासाठी बंपर ऑफरचा धमाका केलाय. मात्र, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपल्याला एकाच वेळी मोठी किंमत मोजावी लागणार आहे. काय आहे जीओचा हा ‘नविन प्लॅन’ याविषयी आपण जाणून घेऊया.

जीओचा काय आहे ‘नवीन प्लॅन’?

दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर जीओने दिवाळी सेलिब्रेशन ऑफर जाहीर केली आहे. जीओची ही ऑफर काही नविन नाही. मात्र, पूर्वीच्या तुलनेत या प्लॅनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. डिस्ने + हॉटस्टार या प्लॅनमध्ये पूर्वी उपलब्ध होता. मात्र, तो आता उपलब्ध नाही. याठीकाणी एक वर्षाची वैधता असलेला हा प्लॅन दररोज डेटा, एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग ऑफरसह येतो.

आणखी वाचा : नेटकऱ्यांना लगाम! आक्षेपार्ह विधानं, ट्रोलिंगवर आता इंस्टाची नजर

‘हा’ आहे वर्षभराचा प्लॅन

दिवाळी सेलिब्रेशन ऑफरचा लाभ २९९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर उपलब्ध आहे. जीओ रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना एका वर्षाची वैधता मिळते. यामध्ये त्यांना दररोज २.५ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग फायदे मिळतात. संपूर्ण प्लानमध्ये यूजर्सना एकूण ९१२.५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, जीओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्यूरिटी आणि जिओ क्लाऊड वर मोफत प्रवेश मिळतो. डेटा मर्यादा संपल्यानंतर वापरकर्त्यांना ६४Kbps च्या वेगाने डेटा मिळेल.

फायद्याच बोलू !
आपल्या फायद्याचं बोलायचं झालं तर यात फर्न आणि पेटल्सकडून ७९९ रुपयांच्या खरेदीवर १५० रुपयांची सूट मिळेल. ग्राहकांना Ixigo वर ४५०० आणि त्यावरील फ्लाइट तिकिटांवर ७५० रुपयांची सूट मिळत आहे.या ऑफर अंतर्गत ग्राहकांना Zoomin कडून २९९ रुपये किमतीचे २ मिनी मॅग्नेट मोफत मिळतील.तत्पुर्वी, वापरकर्त्यांना शिपिंग शुल्क भरावे लागेल. जीओ कडून २९९० रुपये किंवा त्याहून अधिकच्या खरेदीवर १००० एक्सचेंज ऑफर उपलब्ध असेल.त्याचबरोबर ग्राहकांना अर्बन लॅडरवरून खरेदीवर १५०० रुपयांची सूट मिळेल. अर्थात आपल्या ग्राहकांना एकूण ३६९९ रुपयांची ऑफर मिळेल. तर जीओच्या या ऑफरमुळं आपली मनोरंजनमय दिवाळी साजरी होऊ शकते.

Story img Loader