आजच्या काळात फोनमध्ये किंवा आपल्या घरात आवश्यक कागदपत्र सांभाळून ठेवणे कठीण आहे. कारण जर आपला फोन खराब झाला किंवा चोरी झाला तर या कागदपत्रांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरामध्येही हे कागदपत्र गहाळ होण्याची शक्यता असते. याच समस्या लक्षात घेऊन सरकारने जनतेसाठी एक क्लाउड आधारित अॅप तयार केले आहे. याचे नाव आहे डिजी लॉकर. यामध्ये आपण डिजिटल स्वरूपात आपले ड्राइव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅनकार्ड, कार नोंदणी प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र इ. दस्तऐवज सांभाळून ठेवू शकतो. या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमची खरी कागदपत्रे इथे-तिथे फिरवण्यापेक्षा घरी एका जागी सांभाळून ठेवू शकता आणि गरज भासल्यास या अॅपच्या मदतीने दाखवू शकता.
एखाद्या व्यक्तीच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेले, डिजी लॉकर अॅप वापरकर्त्यांना त्यांचे दस्तऐवज संग्रहित करण्यासाठी १जीबी क्लाउड स्टोरेज प्रदान करते. क्लाउड स्टोरेज सुरक्षित आहे कारण ते सर्व माहिती प्रसारित करण्यासाठी २५६-बिट सुरक्षित सॉकेट लेयर (SSL) एन्क्रिप्शन वापरते. जाणून घेऊया या अॅपमध्ये आपले अकाउंट कसे सुरु करावे आणि यामध्ये आपली कागदपत्रे कशो अपलोड करावी.
Ukraine-Russia युद्धाच्या पार्श्वभूमीवर गुगलची मोठी कारवाई; रशियाच्या ‘या’ अॅपवर घातली बंदी
डिजी लॉकर मध्ये अकाउंट कसे तयार करावे?
- सर्वप्रथम, तुम्ही सरकारी वेबसाइट digilocker.gov.in वर जा.
- आता साइन अप पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी इत्यादी सर्व आवश्यक माहिती सबमिट करा आणि तुमचा तयार केलेला पासवर्ड टाका.
- तुमच्या दिलेल्या नंबरवर ओटीपी येईल.
- आता तुम्ही ओटीपी किंवा फिंगरप्रिंट पर्याय वापरून प्रक्रिया पूर्ण करू शकता.
- यानंतर तुम्ही तुमचे युजरनेम आणि पासवर्ड तयार करून लॉग इन करू शकाल.
डिजी लॉकरवर कागदपत्रे कशी अपलोड करायची?
- प्रथम डिजी लॉकर अॅप डाउनलोड करून लॉगिन करावे.
- अॅप डाउनलोड केल्यानंतर, सर्वप्रथम अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करा आणि नंतर अपलोड आयकॉनवर क्लिक करा.
- आता, स्थानिक ड्राइव्हवरून फाइल शोधा आणि ती अपलोड करण्यासाठी ‘ओपन’ पर्याय निवडा.
- अपलोड केलेल्या फाइलचे वर्गीकरण करण्यासाठी ‘सिलेक्ट डॉक टाइप’ वर क्लिक करा. येथे सर्व कागदपत्रे एकत्र दिसतील.
- त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फाइलचे नाव देखील बदलू शकता.