गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ओपनआयने ChatGpt हा चॅटबॉट लॉन्च केला आहे. त्यावर अनेक प्रकारचे संशोधन अजून सुरु आहे. त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी अनेक कंपन्यांनी देखील आपले AI चॅटबॉट लॉन्च केले आहेत. काही जण त्यावर काम करत आहेत. काही कालावधीपूर्वी गीता Gpt नावाचे एक टूल लॉन्च झाले होते. ज्यामध्ये लोकांना भगवद्गीतेवर आधारित प्रश्नांची उत्तरे मिळतात. आता असाच एक Kissan Gpt नावाचा चॅटबॉट लॉन्च झाला आहे. हा चॅटबॉट शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे गीता Gpt

Google च्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने भगवद्गीतेवर एक Gita GPT AI चॅटबॉट विकसित केला आहे. गीता चॅटबॉटच्या मदतीने वापरकर्ते आपल्या दैनंदिन समस्यांबाबत गीतेचा सल्ला घेऊ शकणार आहेत. म्हणजेच वापरकर्ते या प्लॅटफॉर्मवर जे काही प्रश्न विचारतील त्याचे उत्तर AI चॅटबॉट भगवद्गीतेच्या मदतीने देणार आहे. Gita GPT हा सुद्धा एक चॅटजीपीटीसारखा AI Chatbot आहे.

हेही वाचा : ChatGpt News: गुगल इंजिनीअरने बनवले Gita Gpt; जाणून घ्या कोणत्या प्रश्नांची मिळणार उत्तरे

काय आहे किसान Gpt ?

किसान GPT एक AI चॅटबॉट आहे जो चॅट GPT 3.5 वर आधारित आहे. या चॅटबॉटद्वारे शेतकरी शेतीशी संबंधित कोणत्याही समस्येवर उपाय मिळवू शकतात. प्रतिक देसाई यांनी १५ मार्च रोजी चॅट जीपीटी लाँच केले. या चॅटबॉटमध्ये प्रवेश करण्यासाठी, तुम्हाला https://kissangpt.com/ वर जावे लागेल. ही वेबसाइट वापरण्यासाठी अतिशय सोपी आहे. तुम्ही वेबसाइटवर जाताच तुम्हाला १४ भाषांचे पर्याय मिळतील, त्यापैकी तुम्हाला एक भाषा निवडावी लागेल. त्यानंतर तुम्ही त्या भाषेत तुमची समस्या चॅटबॉटला सांगू शकणार आहात. समस्या ऐकल्यावर, चॅटबॉट तुम्हाला काही सेकंदात त्याचे उत्तर देईल.

हेही वाचा : ChatGPT ने भारतविषयी सांगितल्या ‘या’ १० गोष्टी; ज्या तुम्हालाही माहिती नसतील, जाणून घ्या

किसान GPT मध्ये बगची समस्या असू शकते कारण त्यावर अजून काम सुरू आहे. कधीकधी ते तुम्हाला चुकीची उत्तरे किंवा अपूर्ण उत्तरे देखील देऊ शकते. प्रतिक देसाई यांनी सांगितले, या चॅटबॉटमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी GPT-4 ला यासोबत जोडले जाईल.

किसान जीपीटी केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही तर शाळकरी मुले, संशोधक किंवा इतर कोणीही त्याचा वापर करू शकतात. ३१ मार्च रोजी अपडेटेड ट्विटमध्ये प्रतीक देसाई यांनी सांगितले की लवकरच किसान GPT ला सरकार आणि कृषी संस्थेशी जोडले जाईल. यासोबतच एक App देखील तयार करण्यात येत आहे जेणेकरुन लोकांना या App च्या माध्यमातून त्याचा वापर करता येईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kissan gpt help indian farmers solve problem agriculuture know how to use and check details tmb 01