आधुनिक तंत्रज्ञानामुळे विविध उपकरणांनी आपले दैनंदिन आयुष्य खूपच सुकर झाले आहे. तुम्ही अगदी स्वयंपाकघरात नुसते डोकावून पाहिलेत तरी तुमच्या लक्षात येईल की फ्रिज, मिक्सर, मायक्रोवेव्ह, पाण्याचा फिल्टर एवढ्या कितीतरी गोष्टींचा उपयोग करून आपण दररोज स्वयंपाक बनवत असतो. या सर्व गोष्टींमुळे दररोज अन्नपदार्थ बनवणे, साठवून ठेवणे खूप सोईचे होते. मात्र, तरीही आपल्याला काही ठरावीक पदार्थ बनवताना खूप कंटाळा किंवा वैताग येत असतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे डोसा. कधी कधी आपला तवा जुना असल्यामुळे डोशाचे पीठ त्यावर चिकटून बसते; तर कधी आपल्याला हवा तसा अगदी कुरकुरीत डोसा तयार होत नाही. बरे चवीसाठी जरी हा पदार्थ खूप सुंदर लागत असला तरीही एकेक डोसा बनवत बसण्यात खूप वेळ जातो.

मात्र, सोशल मीडियावर @beebomco या इन्स्टाग्राम अकाउंटने तुमच्या या सर्व प्रश्नांवरचे एक अत्यंत आधुनिक व भन्नाट असे उत्तर शोधून काढले आहे. या अकाउंटवरून टाकलेल्या व्हिडीओमधून चक्क एका ‘डोसा प्रिंटर’बद्दलची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही साधारण अशा प्रिंटरसारखे दिसणारे हे एक उपकरण आहे. मात्र, त्यामधून पेपर नव्हे, तर तुम्हाला हवे तसे डोसे अक्षरशः एका मिनिटात प्रिंट होऊन मिळतात.

Health Benefits of Daily Hugs
तुम्ही दररोज किती वेळा मिठी मारता? जाणून घ्या, मिठी मारणे हे आरोग्यासाठी कसे फायदेशीर?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
wastage of food grains
विश्लेषण: शेतमालाची नासाडी केव्हा थांबणार?
israel anti missile system
विश्लेषण: इस्रायलप्रमाणे भारताकडेही परिणामकारक क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा आहे का?
loksatta kutuhal handwriting recognition intelligent character recognition technology
कुतूहल : हस्ताक्षर ओळख – वैविध्यातून शिक्षण
loksatta kutuhal artificial intelligence technology recognizing human handwriting
कुतूहल : हस्ताक्षर ओळखणारे तंत्रज्ञान
accuracy of facial recognition technology
कुतूहल : चेहऱ्यावरून ओळख पटवताना सावधान!
Agricultural policy changes Increase in edible oil import duty Elections farmer print eco news
कृषिधोरण बदलांची क्षेपणास्त्रे ‘बूमरॅंग’ होणार?

हेही वाचा : Amazon Great Republic Day sale: केवळ ‘इतक्या’ हजारांमध्ये व्हा iPhone 13 चे मालक! मात्र विकत घेण्याआधी ‘हे’ मुद्दे लक्षात घ्या…

या प्रिंटरमध्ये मागच्या बाजूला एक ट्रे बसवण्यात आला आहे; ज्यामध्ये तुम्ही तुमचे डोशाचे तयार पीठ घालून, तुम्हाला हवी तशी जाडी [पातळ ते जाड] सेट करून डोसा प्रिंट करू शकता. या प्रिंटरमधून तुम्हाला एका वेळेस पाच डोसे प्रिंट करून मिळू शकतात. तसेच डोशांचा कुरकुरीतपणाही तुम्ही मशीनमध्ये वेळ सेट करून ठरवू शकता. हा प्रिंटर स्वच्छ करणेसुद्धा अतिशय सोपे आहे. प्रिंटरच्या मागे असलेला ट्रे तुम्ही अगदी सहज काढून पाण्याखाली धुऊ शकता. तुम्हला हव्या त्या चवीचे पीठ यामध्ये घालता येऊ शकते, अशी माहिती या व्हिडीओवरून मिळते.

स्वयंपाकघरात अत्यंत उपयुक्त आणि झटपट डोसे बनवण्यासाठी फायदेशीर ठरणारे हे उपकरण अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग साईटवरही उपलब्ध आहे. हा डोसा मेकर किंवा प्रिंटर ‘इव्होशेफ’ (Evochef) कंपनीने बनवला असून, तो एक वर्षाच्या वॉरंटीसह सध्या १३,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

या भन्नाट व अतिशय उपयुक्त अशा डोसा प्रिंटरचा हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहू.

हेही वाचा : Viral video : पोटावर एक मुलगी अन् खांद्यावर लहान मुलाला घेऊन पठ्ठ्याने ‘पाठीवर’ मारल्या दोरीच्या उड्या; नेटकरी म्हणाले…”

एकाने, “जरी मी डोशाचे पीठ आणून किंवा घरी बनवून त्याचे डोसे प्रिंट करून घेतले तरीही त्यासोबत लागणारी चटणी, सांबार आणि बटाट्याची भाजी कोण बनवणार?”, अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे. “अरे… लॅमिनेशन मशीनला डोसा मेकर म्हणून विकत आहेत,” असे दुसऱ्याने लिहिलेय. “डोसे बनवणे खरंच इतकं अवघड असतं का?”, असे तिसरा विचारत आहे. “माझी आई यापेक्षा भारी बनवते,” असे चौथा म्हणतो. तर शेवटी पाचव्याने, “आता याला खरंच पेपर डोसा म्हणता येईल,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

@beebomco या इन्स्टाग्राम अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडिओल आत्तापर्यंत २.१ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.