Samsung Galaxy S24 ही स्मार्टफोन सीरिज लवकरच म्हणजे येत्या १७ जानेवारीला लॉन्च होणार आहे. असे असताना मात्र या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि प्रीमियम लाइनप लीक झाले असल्याचे समजते. काय असणार आहे या फोनची खासियत .

Galaxy S24 आणि S24+ या दोन्ही स्मार्टफोनमध्ये Exynos 2400 चिप किंवा Snapdragon 8 Gen 3 वापरण्यात येणार आहे. तर गॅलेक्सी S24 अल्ट्रा हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 3 वापरणार असल्याची सगळीकडे चर्चा असल्याचे गॅजेट ३६० डिग्रीच्या एका लेखातून समजते. तर, जर्मनच्या विनफ्युचर डॉट दे या प्रकाशनाने सॅमसंग गॅलेक्सीचे सर्व स्पेसिफिकेशन्स लीक केले आहेत, असेही समजते.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Pimpri Chinchwad Anti Terrorism Branch exposed gang of fake police verification certificates
बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देणार्‍या टोळीचा पर्दाफश
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
PAN 2 0 is going Digital Will you still need a physical PAN card as ID proof and KYC document
PAN 2.0 आता डिजिटल होणार: अजूनही फिजिकल PAN कार्डची गरज भासेल का?
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित

हेही वाचा : फ्लिपकार्टचा Republic Day Sale ‘या’ तारखेपासून होणार सुरू! ग्राहकांना आयफोनपासून ‘या’ उत्पादनांवर मिळणार भरघोस सूट

या वेबसाइटनुसार Galaxy S24 and Galaxy S24+ युरोपियन प्रदेशांमध्ये Exynos 2400 चिपसेटवर काम करतील; तर इतर प्रदेशांच्या बाजारात Snapdragon 8 Gen 3 SoC स्पेसिफिकेशनचे स्मार्टफोन्स उपलब्ध असतील. त्याचबरोबर सर्व प्रदेशांमध्ये सॅमसंगच्या S24 अल्ट्रा पॉवरबाय Qualcomm Snapdragon 8 Gen 3 SoC असणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
साधारण गॅलेक्सी S24 मध्ये ८GB रॅम असणार असून, इतर टॉप एण्ड मॉडेल्समध्ये १२GB रॅम मिळणार आहे.

Galaxy S24 हा कदाचित ६.२ इंचाचा संपूर्ण HD+ (1,080×2,340 पिक्सेल्स) Dynamic AMOLED स्क्रीन आणि १२०Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध होऊ शकतो. त्यामध्ये १२८GB आणि २५६GB स्टोरेज पर्याय असणार आहेत.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, ट्रिपल रेअर कॅमेरा युनिटमध्ये, ५० मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा, १२ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा बसवला असून, ३०x स्पेस झूमसह ३ ऑप्टिकल झूम आणि १० मेगापिक्सेल टेलीफोटो सेन्सर बसवण्यात आला आहे. त्यामध्ये ४०००mAh इतक्या शक्तीची बॅटरी देण्यात आली आहे, असे म्हटले जात आहे.

Galaxy S24+ या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच (1,440×3,120 pixels) Dynamic AMOLED डिस्प्लेसह १Hz ते १२०Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट असणार आहे. त्यामध्ये २५६GB and ५१२GB हे स्टोरेज पर्याय असू शकतात. Galaxy S24 प्रमाणेच यामध्येही ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे. मात्र, याची बॅटरी ४,९००mAh इतक्या शक्तीची असण्याची शक्यता सांगितली जात आहे.

Galaxy S24 Ultra लाइनअपमधील सर्वांत वर असणारा स्मार्टफोन. लीक झालेल्या माहितीनुसार यामध्ये ६.८ इंचाचा QHD+ Dynamic AMOLED डिस्प्ले असणार आहे. १२GB स्टॅण्डर्ड रॅमसह यामध्ये २५६GB, ५१२GB and १TB स्टोरेज पर्याय उपलब्ध होणार असल्याचे समजते.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये २०० मेगापिक्सेलचा प्रायमरी क्वॉड रेअर कॅमेरा सेटअप असणार आहे; ज्यामध्ये १२ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड शूटर, ५x ऑप्टिकल झूमसह ५० मेगापिक्सेल टेलीफोटो शूटर, ३x ऑप्टिकल झूम स्पोर्टसह १० मेअगापिक्सेल टेलीफोटो शूटर बसवण्यात आले आहे, असे समजते. या फोनमध्ये कदाचित १००x स्पेस झूमलादेखील सपोर्ट मिळू शकतो. टायटॅनियम फ्रेम असू शकणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ५,०००mAh बॅटरी बसवण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सीच्या या नव्याकोऱ्या सीरिजचे लॉंचिंग १७ जानेवारी रोजी होणार असून, त्यांनी ग्राहकांसाठी प्री-रिझर्व्हेशनदेखील सुरू केले आहे.

Story img Loader