Step Wise Guide To Create IPhone App Shortcuts : दैनंदिन जीवनात मोबाईल फोनचा वापर केला नाही, तर अनेकांचा जीव गुदमरल्यासारखा होत असेल. कारण आजच्या युगात मोबाईल फोन म्हणजे अनेकांची जीवनवाहिनीच बनला आहे. दिवसेंदिवस स्मार्ट फोन्समध्ये अपग्रेडेड व्हर्जन्स पाहायला मिळत आहेत. अशातच जर आयफोनबद्दल बोलायचं झालं, तर प्रत्येकाला हा लक्झरी फोन वापरण्याची इच्छा होत असेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु, ज्यांच्याकडे आताच्या घडीला अॅप्पल कंपनीचा आयफोन आहे. त्यांनी या आयफोनमध्ये अॅप्लिकेशन्सच्या शॉर्टकट्स कशा सेट करायच्या, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली पाहिजे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयफोनमध्ये तुम्ही विविध प्रकारच्या स्टोअर थिम्स वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला एक महत्वाची प्रोसस फॉलो करावी लागते. शॉर्टकट्स अॅपच्या माध्यामातून तुम्ही अॅप्पल अॅप आयकॉन्स आणि डिफॉल्ट डायनॅमिक आयकॉन्स सेट करू शकता. यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

नक्की वाचा – ‘त्या’ तरुणाला २१ तोफांची सलामी! जाळ्यात अडकलेल्या डॉल्फिनला वाचवण्यासाठी तरुणाने काय केलं? Video एकदा पाहाच

आय कॅचिंग आयकॉन क्रिएट करा.

१) शॉर्टकट अॅप्लिकेशन्समध्ये जा.
२) अॅक्शन सजेशन्समधून ओपन अॅप सिलेक्ट करा.
३) प्रेफर्ड अॅप निवडण्यासाठी ओपन अॅपवर क्लिक करा.
४) त्यानंतर होमस्क्रीन अॅड करण्यासाठी ओपन अॅपवर क्लिक करा.
५) आता तुम्ही अॅप्लिकेशनसाठी इमेज आणि नाव सेट करू शकता.
६) एकदा तुम्ही ADD वर क्लिक केलं, की होमस्क्रीनवर शॉर्टकट अॅड होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about step wise guide to create iphone app shortcuts to redesign app icons in apple iphone technology latest news update nss