Kohler New Smart Toilet : इंटरनेटवर सध्या एका शौचालयाची चर्चा आहे. हे शौचालय त्याचे फीचर्स आणि किंमतीमुळे लक्षवेधक ठरत आहे. कोहरलने Kohler Numi 2.0 हे शौचालय ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे. या स्मार्ट शौचालयाची किंमत जावळपास ११ हजार ५०० डॉलर्स आहे जे भारतीय चलनात जवळपास ९ लाख २५ हजार रुपये आहे. या शौचालयात काय आहे खास? जाणून घेऊया.

शौचालयामध्ये स्पीकर्स, अलेक्सा, उबदार सीट मिळते. शौचालयात भरपूर एलईडी लाइट्स देखील मिळतात. कोहलरने पहिल्यांदा सीईएस २०१९ मध्ये हे स्मार्ट शौचालय दाखवले होते आणि ते खरेदीसाठी उपलब्ध आहे. त्याची किंमत जवळपास ९ लाख २५ हजार रुपये आहे. एका शौचालयासाठी ही खूप मोठी किंमत आहे. परंतु, नुमी शौचालयाला काही खास फीचर्स देण्यात आले आहेत.

Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
Viral video of a man carries a snake to the hospital after it bites him
सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम
The monkey pulled the girl's hair
‘त्याने तिचे केस ओढले आणि…’ माकडाबरोबर मस्ती करणं पडलं महागात; VIDEO पाहून बसेल शॉक
Women Fall From A Plastic Bucket While Standing On It To Check The Quality Funny Video Viral
“देवा काय करावं या बायकांचं?” क्वालिटी चेक करायला १५० रुपयांच्या बादलीवर उभी राहिली अन् तोल गेला; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
Most robotic surgeries performed by Tata hospital in shortest time
टाटा रुग्णालयाकडून कमी कालावधीत सर्वाधिक रोबोटिक शस्त्रक्रिया

(Airtel युजर्स Disney + Hotstar सब्सक्रिप्शन असे मिळवा मोफत)

Kohler Numi 2.0 शौचालयात बिल्ट इन अलेक्सा आणि एलईडी लाइट्स मिळतात. यामुळे रात्री शौचालय वापरताना तुम्हाला लाइटची गरज भासणार नाही, कारण हे एलईडी आवश्यक तेवढा प्रकाश देतात. शौचालयाला स्पीकर्स देण्यात आले आहेत. या स्पीकर्सशी फोन कनेक्ट करून तुम्ही गाणी ऐकू शकता.

तीव्र हवामान परिस्थितीत लोकांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्याचे हे शौचालय निराकरण करते. हवामान थंड असल्यास शौचालयाचे गरम होणारे सीट तुम्हाला उब देते. यात ऑटो डिओडोरायझिंग मोड देखील आहे जो सुगंध सोडतो. या शौचालयात हाइट अ‍ॅडजेस्टमेंट फीचर देखील देण्यात आले आहे. आरोग्यासंबंधी समस्या असलेल्या व्यक्तींसाठी हे फीचर फायदेशीर ठरू शकते. इतकेच नव्हे तर शौचालय ऑटो ड्रायर फिचरसह मिळतो. हे सर्व फीचर रिमोटद्वारे नियंत्रित करता येतात. हे सर्व फीचर्स महागड्या किंमतीसह येतात.

(नवीन Smartphone खरेदी करण्याच्या विचारात आहात? मग ‘या’ ४ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल पश्चाताप)

वर्जनुसार, हे शौचालय डिस्ट्रीब्युटर्सकडे उपलब्ध आहे. येत्या काही दिवसांत ते अमेरिकेतील लोकांसाठी उपलब्ध होईल. कोहलरने अजून भारतात स्मार्ट शौचालय सादर केलेले नाही, त्यामुळे देशात Numi 2.0 कधी लाँच होईल हे याबद्दल माहिती नाही.