Kunal Kamra Response To CEO Bhavish Aggarwal Diwali Celebration Video : कॉमेडियन कुणाल कामरा याने पुन्हा एकदा इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी ‘ओला इलेक्ट्रिक’वर निशाणा साधला आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिवाळी सेलिब्रेशनचा @bhash एक्स (ट्विटर) वर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ओला इलेक्ट्रिकच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कशाप्रकारे दिवाळी साजरी केली आहे, याची छोटी झलक दाखवण्यात आली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला सर्व कर्मचारी हातात दिवे घेऊन एकत्र उभे असतात. त्यानंतर दिवाळीनिमित्त त्यांनी केलेली सजावट, रांगोळी आणि कर्मचाऱ्यांना दिलेली गिफ्ट्ससुद्धा व्हिडीओत दाखवण्यात आली आहेत.
तर हा व्हायरल व्हिडीओ पाहून कॉमेडियन कुणालने “सर्व्हिस स्टेशनचा फुटेज दाखवा…” असं म्हणत टीका केली आहे. म्हणजेच कॉमेडियन कुणालचे असे म्हणणे आहे की, या व्हिडीओमध्ये काही खरे नाही, त्यामुळे खरी परिस्थिती दर्शवणारे फुटेज दाखवा. कुणालने ओला कंपनीच्या सेवेसाठी दोन इतर पोस्टही शेअर केल्या. त्यात त्याने ओलाच्या विक्रीनंतरच्या सेवेला लक्ष्य करून एक व्हायरल मीम वापरून टीका केली आहे. एका दुसऱ्या पोस्टमध्ये एक मीम आहे, ज्यात “ओला विक्रीच्या आधी” आणि “विक्रीनंतर” याची तुलना करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये ओला विकत घेतल्यानंतरची सेवा कशी खराब आहे हे दाखवले आहे.
पोस्ट नक्की बघा…
ओला-कुणाल कामरा वाद :
या ऑनलाइन भांडणाची सुरुवात OLA ई-बाईकच्या सर्व्हिस सेंटरचा एक फोटो शेअर केल्यामुळे झाली होती. जिथे अनेक बाईक दुरुस्तीच्या प्रतीक्षेत धूळ खात उभ्या होत्या. कुणाल कामरा यांनी सेवेवर प्रश्न उपस्थित केले असता ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी त्यांना खडसावले. आमच्यासाठी काम करा, तुमच्या अयशस्वी कॉमेडी करिअरपेक्षा आम्ही तुम्हाला जास्त पैसे देऊ असेही ते म्हणाले. तेव्हापासून सोशल मीडियावर दोघांमधील चर्चेला उधाण आले आहे.
हा वाद काही दिवसांपूर्वीच झाला असून आता पुन्हा कुणालने भाविश अग्रवाल यांच्यावर निशाणा साधला आहे आणि ग्राहकांच्या तक्रारी अधोरेखित करणे सुरूच ठेवले आहे. याचदरम्यान कुणालने अग्रवाल यांचे आव्हान स्वीकारले आहे. पोस्टमध्ये सतत टॅग, तक्रार केल्यामुळे मी आता ओलाच्या कर्मचाऱ्यासारखा वाटतो आहे, असेदेखील कुणाल म्हणतो आहे.