Laptop Hanging Issue : ऑफिसेसह शाळा, कॉलेजमध्ये आता अनेक कामांसाठी लॅपटॉपचा वापर होतो. यात work from home आणि ऑनलाइन अभ्यासासाठी आता लॅपटॉपचा वापर जास्त वापर केला जात आहे. पण लॅपटॉप चालू होण्यापूर्वी किंवा चालू असताना जास्त गरम होण्याची शक्यता असते. लॅपटॉप गरम होण्याची समस्या गंभीर नसली तरी यामुळे डिव्हाइसचे नुकसान होऊ शकते. यामुळे लॅपटॉप थंड ठेवणे खूप महत्वाचे आहे. यामुळे आम्ही तुम्हाला लॅपटॉप थंड ठेवण्यासाठी काय करावे यासाठी सोप्या टिप्स सांगणार आहोत. जाणून घेऊ या टिप्स
थर्मल पेस्ट बदला
थर्मल पेस्ट लॅपटॉपच्या प्रोसेसर आणि ग्राफिक्स कार्डमध्ये हिट डिस्ट्रीब्यूट करते. लॅपटॉपमधील या हिटवर नियंत्रण ठेवण्यासाठी बहुतांश लॅपटॉप कंपन्या त्यांच्या प्रोडक्टमध्ये थर्मल पेस्टचा वापर करतात. पण ही पेस्ट जुनी होताच लॅपटॉप गरम होऊ लागतो. म्हणून, जर तुमच्या लॅपटॉपचा प्रोसेसर खूप गरम असेल, तर तुम्ही थर्मल पेस्ट बदलण्याचा विचार करू शकता.
हेही वाचा : Google Docs वर युजर्स इमोजीद्वारे देऊ शकतात कमेंट्सना रिप्लाय; जाणून घ्या खास फिचरबद्दल
लॅपटॉपच्या खाली काहीतरी ठेवा
तुमचा लॅपटॉप थंड ठेवण्यासाठी तो शक्य तितक्या उंचावर ठेवा. लॅपटॉप काही उंचीवर ठेवल्याने त्याखालून हवा सहज पासआउट होऊ शकते.
वेंटिलेशन
लॅपटॉप थंड ठेवण्यासाठी त्याचे वेंटिलेशन सुनिश्चित करा. लॅपटॉपच्या बॅक आणि साइडला वेंटिलेशन ग्रिल असतात, ज्यामुळे लॅपटॉप आपोआप थंड होऊ शकतो. हे ग्रिल फ्री सोडा जेणेकरून हवा आपोआप आत जाईल आणि लॅपटॉप थंड राहू शकेल.
वॉकिंग टेबल
लॅपटॉप थंड ठेवण्यासाठी तुम्ही वॉकिंग टेबल वापरू शकता. लॅपटॉपच्या खाली एक वॉकिंग टेबल ठेवता येते जेणेकरून लॅपटॉपच्या खालून हवा आपोआप निघून जाईल आणि लॅपटॉप थंड होईल. आजकाल लोक त्यांचा लॅपटॉप थंड ठेवण्यासाठी याचा वापर करतात, या पद्धती खूप प्रभावी आहेत आणि जर तुम्हालाही तुमचा लॅपटॉप थंड ठेवायचा असेल तर तुम्ही या काही सोप्या टिप्स फॉलो करु शकता.