Aadhaar Card Update: युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्याची अंतिम मुदत १४ जून २०२४ पर्यंत वाढवली आहे. याचा अर्थ भारतीय रहिवाशांना त्यांच्या ओळखीचा पुरावा (POI) आणि पत्त्याचा पुरावा (POA) अपडेट करण्यासाठी जवळपास १० दिवस शिल्लक राहिले आहेत.

आधार नोंदणी आणि २०१६ च्या अपडेट नियमानुसार व्यक्तींनी त्यांचे POI आणि POA डॉक्युमेंट्री त्यांच्या आधार नोंदणी तारखेपासून दर दहा वर्षांनी अपडेट केले पाहिजेत. ही आवश्यकता ५ आणि १५ वर्षांच्या मुलाच्या ब्लू आधार कार्डवर बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठी देखील लागू होते. विशेष म्हणजे तुम्ही नाव, पत्ता, जन्मतारीख/वय, लिंग, मोबाइल नंबर, ईमेल पत्ता, नात्याचा पुरावा आदी लोकसंख्याशास्त्रीय माहिती अपडेट करू शकता.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Free Aadhaar update details in marathi
Free Aadhaar update: उरला फक्त शेवटचा १ दिवस, आधारकार्डशी संबंधित ‘हे’ काम पटापट करा, अन्यथा…;
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
Pan Card For Minor
Pan Card For Minor :१८ वर्ष पूर्ण होण्याआधी काढू शकता पॅन कार्ड, फक्त ‘ही’ कागदपत्रे लागणार; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस…
9th december 2024 Marathi Daily Horoscope in marathi
९ डिसेंबर पंचांग; दुर्गाष्टमीला सिद्धी योगामुळे १२ राशींचा आयुष्यात होतील मोठे बदल! सोमवारी तुमचे नशीब चमकणार का?
Kanya Rashifal 2025
नववर्षात कन्या राशीच्या लोकांच्या व्यवसाय आणि करियरवर होईल वाईट परिणाम? जाणून घ्या कसे जाईल २०२५?
lord hanuman favourite zodiac signs these horoscope will shine in new year 2025
२०२५मध्ये बजरंगबलीच्या कृपेने या राशींचे नशीब पलटणार! मिळेल पैसा, मान सन्मान, चांगला पगार अन् पदोन्नती, विवाह योग निर्माण होणार

तुमचं आधार कार्ड ऑनलाइन कसं अपडेट कराल?

१. UIDAI वेबसाइटवर जा – युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या uidai.gov.in च्या वेबसाइटला भेट द्या. तुमची भाषा निवडा.

२. माय आधार टॅबवर क्लिक करा आणि ड्रॉपडाउन मेनूमधून ‘तुमचा आधार अपडेट करा’ हा पर्याय निवडा.

३. पर्याय निवडल्यानंतर तुमच्या समोर ‘अपडेट आधार डिटेल्स ऑनलाइन’ हे पेज दिसेल. त्यानंतर डॉक्युमेंट अपडेटवर क्लिक करा.

४. नंतर तुमचा UID क्रमांक आणि कॅप्चा कोड एंटर करा. त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर टाका. पासवर्ड प्राप्त करण्यासाठी ‘ओटीपी पाठवा’वर क्लिक करा.

हेही वाचा…Vi Prepaid Plans: व्हीआयचा रिचार्ज करा अन् नेटफ्लिक्सचे फ्री सबस्क्रिप्शन मिळवा; नवीन प्लॅन्सची ‘ही’ यादी एकदा पाहाच

५. OTP आल्यानंतर तो तेथे टाका आणि लॉग इन वर क्लिक करा.

६. तुम्हाला अपडेट करायचे असलेले (नाव, पत्ता, जन्मतारीख इ.) पर्याय निवडा आणि नवीन माहिती अचूक भरा.

७. सबमिट करा आणि डॉक्युमेंट अपलोड करा – एकदा तुम्ही आवश्यक बदल केल्यानंतर, सबमिट करावर क्लिक करा आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.

८. सबमिट अपडेट रिक्वेस्टवर क्लिक करा. तुमच्या विनंतीच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी तुम्हाला एसएमएसद्वारे अपडेट विनंती क्रमांक (URN) प्राप्त होईल.

लॅाग इन केल्यानंतर आधारकार्डाची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर असेल.

आधार अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –

तसेच myAadhaar पोर्टलवर तुमच्या आधार अपडेट करण्यासाठी पुढील कागदपत्रे जवळ ठेवा.

ओळखीचा पुरावा : पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, सरकारने जारी केलेले ओळखपत्र, मार्कशीट, लग्नाचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड.

पत्त्याचा पुरावा : बँक स्टेटमेंट (३ महिन्यांपेक्षा जुने नाही), वीज किंवा गॅस कनेक्शनची बिले (३ महिन्यांपेक्षा जुनी नाही), पासपोर्ट, लग्नाचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, सरकारने जारी केलेले आयडी कार्ड इत्यादी कागदपत्रे जवळ ठेवा.

तुम्ही बायोमेट्रिक माहिती ऑनलाइन मोफत अपडेट करू शकत नाही.तुमचा फोटो, IRIS स्कॅन किंवा फिंगरप्रिंट यांसारखी बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट दिली पाहिजे.

  • जवळचे नावनोंदणी केंद्र शोधण्यासाठी UIDAI वेबसाइट bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ वापरा.
  • तुमची बायोमेट्रिक माहिती (फिंगरप्रिंट्स, IRIS स्कॅन आणि फोटो) द्या.
  • केंद्रावर दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा.
  • पडताळणीसाठी कोणतेही आवश्यक डॉक्युमेंट सबमिट करा.
  • तुमच्या बायोमेट्रिक अपडेटच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी तुम्हाला URN सह पोचपावती मिळेल.

Story img Loader