Samsung ने unpacked इव्हेंटमध्ये Galaxy S23 सिरीज भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. दक्षिण कोरियाची असलेली सॅमसंगने S23 सिरीजमध्ये Galaxy S23, Galaxy S23 Plus आणि Galaxy S23 Ultra हे स्मार्टफोन लाँच केले आहेत. या नवीन फोन्सची प्री-बुकिंग भारतात सुरु झाले आहे. १७ फेब्रुवारीपासून हा फोन बाजारपेठेत विक्रीसाठी उपल्बध होणार आहे. मात्र Galaxy S23 सिरीज लाँच होण्यापूर्वी २०२२ मध्ये लाँच झालेल्या Samsung Galaxy S22 च्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत.
Samsung Galaxy S22 चे फीचर्स
Samsung Galaxy S22 या स्मार्टफोनमध्ये ६.१ इंचाचा फुलएचडी प्लस डायनॅमिक एमओलईडी डिस्प्ले येतो. याचा स्क्रीनचा रिफ्रेश रेट ४८ ते १२० Hz आहे. या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि ४ एनएम ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 हा प्रोसेसर येतो. या सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप येतो. यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड सेन्सर आणि १० मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर असलेला कॅमेरा सेटअप येतो. तसेच यात १० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा वापरकर्त्यांना वापरायला मिळतो. तसेच या फोनच्या बॅटरीची क्षमता ३७९९ mAh इतकी आहे.
कमी झाल्या Samsung Galaxy S22 ची किंमत
Samsung Galaxy S22 आता आधीपेक्षा स्वस्त दरात खरेदी करता येणार आहे. तीन महिन्यात किंमत करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी नोहेंबर २०२२ मध्ये या फोनची किंमत १०,००० रुपयांनी कमी करण्यात आली होती. तेव्हा हा फोन ६२,९९९ रुपयांना खरेदी करता येत होता. आता पुन्हा एकदा या फोनची किंमत ५,००० रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
५,००० रुपयांनी किंमत झाल्यावर १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या या फोनची किंमत ५७,९९९ रुपयांना तुम्ही खरेदी करू शकता. २५६ जीबी स्टोरेजचा फोन आता ६१,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. तसेच सॅमसंग शॉपमधून घेतल्यास २००० रुपयांची सूट मिळेल.