LAVA ही एक भारतीय कंपनी आहे. जुलै २०२२ मध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये lava Blaze स्मार्टफोन लॉन्च केला होता. तेव्हापासून, कंपनीने Blaze सिरिजमधील Lava Blaze NXT, Lava Blaze Pro आणि Lava Blaze 5G हे फोन्स लॉन्च केले आहेत. कंपनीने आता याच सिरीजमधला हा फोन लॉन्च केला आहे. कंपनीने Lava Blaze 2 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने सोशल मीडियाद्वारे या फोनबद्दल माहिती दिली आहे.

Lava Blaze 2 चे फीचर्स

Lava Blaze 2 या फोनमध्ये तुम्हाला ६.५ इंचाचा पंच होल HD डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. या फोनमध्ये ५ आणि ६ जीबीसह ११ जीबी रॅमचा पर्याय देखील देण्यात आला आहे. तसेच ५००० mAh ची बॅटरी आणि १८W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज यामध्ये आहे. हा फोन मल्टिटास्किंगला सपोर्ट करतो. सेफ्टी फीचर्समध्ये या फोनला फेसलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर्स देण्यात आले आहेत.

Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
andhra pradesh couple suicide
आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
Lamborghini Catches Fire
Lamborghini Fire : मुंबईतील कोस्टल रोडवर ‘लॅम्बोर्गिनी’ला आग; उद्योगपती गौतम सिंघानियांनी Video केला पोस्ट
Kaun Banega Crorepati Season 16 Amitabh Bachchan says I neither keep cash nor visit an ATM
KBC 16 : अमिताभ बच्चन ATM मध्ये कधीच गेले नाहीत, जया बच्चन यांच्याकडून घेतात पैसे, म्हणाले…
vivek oberoi reveals why he rejected om shanti om film
विवेक ओबेरॉयचा १७ वर्षांनी खुलासा; शाहरुखचा ‘ओम शांती ओम’ सिनेमा का नाकारला? म्हणाला, ” तेव्हा ४ ते ५ महिने…”
MHADA mega list draw scam No inquiry report on draw even after year
म्हाडा बृहतसूची सोडत गैरप्रकार : एक वर्षानंतरही सोडतीचा चौकशी अहवाल गुलदस्त्यात
Schoolboy commits suicide after not getting mobile phone sangli
सांगली: मोबाईल न मिळाल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या

हेही वाचा : Salesforce मधून नोकरी गेल्यावर महिला कर्मचारी भावूक; पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “मला सुरुवातीला…”

हा फोन Amazon वर लिस्ट करण्यात आला आहे. फोनची विक्री देखील Amazon द्वारेच होण्याची शक्यता आहे. तसेच लावा ने लॉन्च केलेल्या या फोनमध्ये तुम्हाला १३ मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. तसेच कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला अनेकप्रकारचे मोडस मिळणार आहेत. यामध्ये पोर्ट्रेट, नाईट, एआय मोड, प्रो मोड, ब्युटी, स्लो, मोशन फोटो, ऑडिओ नोट, टाइम लॅप्स, फिल्टर आणि एचडीआर इत्यादीसह अनेक मोड कॅमेरामध्ये दिले आहेत.

काय असणार फोनची किंमत ?

Lava Blaze 2 हा स्मार्टफोन तुम्ही तीन रंगांमध्ये खरेदी करू शकता. Glass Blue, Glass Black आणि Glass Orange हे तीन रंगांचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. फोनची विक्री १८ एप्रिलला १२ वाजल्यापासून सुरु होणार आहे. तसेच या फोनची किंमत ८,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

Story img Loader