स्मार्टफोन निर्मिती कंपनी लावाने इंडिया मोबाईल काँग्रेस २०२२ इव्हेंटमध्ये बजेट ५ जी फोन लाँच करण्याची घोषणा केली होती. या फोनची किंमत १० हजार रुपयांच्या जवळपास असेल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे, या फोनमध्ये काय फीचर्स मिळतील, तो कसा असेल, हे जाणून घेण्याबाबत ५ जी फोन घेऊ इच्छिणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर या फोनच्या लाँचिंगसाठी मुहूर्त मिळाला आहे. lava blaze 5g हा फोन ३ नोव्हेंबरला लाँच होणार असल्याचे समजले आहे. कंपनीने याची पुष्टी केली आहे. हा फोन ई कॉमर्स संकेतस्थळ अमेझॉनच्या माध्यमातून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हे आहेत फीचर

फोनमध्ये १६००x७२० पिक्सेल रेझोल्युशनसह ६.५ इंच एचडी + एलसीडी पॅनल मिळत आहे. लावाचा फोन ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोअरेज पर्यायासोबत उपलब्ध होणार आहे. कंपनी फोनमध्ये ३ जीबी व्हर्च्युअल रॅम देणार आहे. याने फोनची एकूण रॅम ७ जीबी होणार.

(क्रोम ब्राऊजर तातडीने अपडेट करा, गुगलचे आवाहन, सांगितले ‘हे’ मोठे कारण)

फोनमध्ये डायमेन्सिटी ७०० प्रोसेसरसह दीर्घकाळ काम करता यावे यासाठी ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोन अँड्रॉइड १२ ओएस ऑपरेटिंग सिस्टिमवर चालेल. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सीम, वायफाय ६, ब्ल्युटूथ ५.१, जीपीएस, यूएसबी टाइप सी पोर्ट आणि ३.५ एमएम ऑडियो जॅक देण्यात आला आहे. फोन ब्ल्यू आणि ग्रीन या दोन रंग पर्यायांसह उपलब्ध होणार आहे. माध्यमांतील अहवालांनुसार, फोनची किंमत १० हजारांच्या जवळपास असू शकते.