देशात ५ सेवेचा शुभारंभ झालेला आहे. ५ जी सेवा ४ जी पेक्षा १० पट वेगाने इटरनेट सेवा देईल, असे सांगितल्या जाते. ही सेवा गेमिंग, ऑनलाईन व्हिडिओ आणि इतर कार्यात फायदेशीर ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर आता फोन घेताना ग्राहक ५ जी फोनला पसंती देत आहेत. दरम्यान ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. लावाने आपला ५ जी फोन भारतात लाँच केला आहे. फोनची किंमत सुमारे १० हजार रुपये असण्याची शक्यता आहे.
भारतीय कंपनी लावा इंटरनॅशनलने सोमवारी आपला पहिला ५ जी स्मार्टफोन देशात लाँच केला. या फोनची किंमत १० हजार रुपये असण्याची शक्यता आहे. फोनची प्री बुकिंग दिवाळीच्या आसपास सुरू होणार आहे. किफायतशीर किंमतीमध्ये ग्राहकांना ५ जी स्मार्टफोन देण्याच्या कंपनीच्या दृष्टीकोनाशी हे उत्पादन जुळलेले आहे, असे लावा इंटरनॅशनल कंपनीचे आध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख सुनील रैना यांनी एका निवेदनात सांगितले.
(Google translate : गुगलने चीनमध्ये बंद केले ‘गुगल ट्रान्सलेट’, ‘हे’ आहे कारण)
फोनचे फीचर
Lava Blaze 5G फोनला मागे ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच चांगली सेल्फी काढण्यासाठी फोनच्या पुढील भागात ८ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. गतिमान कार्यासाठी फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०० चिपसेट देण्यात आले आहे. तर फोनमध्ये ४ जीबी रॅमसह ३ जीबी व्हर्च्युअल रॅम देण्यात आली आहे.
फोनमध्ये १२८ जीबीची इंटरनेल स्टोरेज मिळत आहे. दीर्घकाळ काम करता यावे यासाठी फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये साईड माउन्टेड वेगवान फिंगर प्रिंट अनलॉक फिचर देखिल देण्यात आले आहे.
(१०८ एमपी कॅमेरा आणि गतिमान प्रोसेसरसह लाँच झाला Moto G 72, पण ‘हा’ महत्वाचा फीचर नाही)
नवीन तंत्रज्ञान सर्वांना वापरता यावे यासाठी हा या ५ जी फोनचा हेतू आहे, असे मीडियाटेक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अंकू जैन म्हणाले. दरम्यान लावाच नव्हे तर आता अनेक कंपन्या बाजारामध्ये परवडणाऱ्या किंमतीत ५ जी फोन्स लाँच करत आहेत. या फोन्समध्ये अनेक फीचर आहेत. यांना भारतातच बनवलेला हा लावा फोन जोरदार आव्हान देईल का, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.