Lava Blaze 5G: आजकाल बाजारात अनेक नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. प्रत्येक स्मार्टफोन बनवणारी कंपनी आपला स्मार्टफोन हा इतर कंपन्यांपेक्षा वेगळा ठेवण्याचा प्रयत्न करतात. आता नुकतात Lava या स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीकडून आपला नवीन ‘Lava Blaze 5G’ फोन लॉन्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा स्मार्टफोन देशातील सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन असून आता हा स्मार्टफोन लवकरच तुमच्या हातात येणार आहे.
कधी येणार हातात ?
Lava Blaze 5G हा स्मार्टफोन १५ नोव्हेंबरपासून दुपारी १२ वाजता ई-कॉमर्स वेबसाइट amazon india वर विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
Lava Blaze 5G किंमत
Lava Blaze 5G हा स्मार्टफोन ग्लास ब्लू आणि ग्लास ग्रीन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला गेला आहे. त्याच वेळी, फोनच्या ४ जीबी रॅमसह १२८ जीबी स्टोरेजची किंमत १९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तथापि, विशेष लॉन्च ऑफर अंतर्गत, हा फोन ९,९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.
स्मार्टफोन काय असेल खास ?
या नवीन Lava Blaze 5G मध्ये Dimensity ७०० प्रोसेसरही देण्यात आला असेल. यामध्ये १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज देखील आहे जे मायक्रोएसडी कार्ड स्लॉटद्वारे वाढवता देखील येईल. या फोनमध्ये प्री-इंस्टॉल Android 12 OS ही देण्यात आला आहे. तसेच यामध्ये ५,०००mAh ची दीर्घकाळ टिकू शकणारी बॅटरी देखील देण्यात आली आहे.
कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये ड्युअल सिम, वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.१, जीपीएस, यूएसबी टाइप सी पोर्ट आणि ३.५ मिमी ऑडिओ जॅक असेल.
डिस्प्ले बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये कंपनी १६००×७२० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.५-इंच HD + LCD पॅनेल देत आहे, ज्याचा रीफ्रेश रेट ९०Hz असेल. तसेच या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ३ जीबी व्हर्चुअल रॅम देखील देणार आहे. म्हणजेच या फोनची एकूण रॅम ७ जीबी असेल.