भारतीय स्मार्टफोन कंपनी लावा आपला नवीन बजेट स्मार्टफोन लॉंच करण्याच्या तयारीत आहे. लावाचा नवा हँडसेट लवकरच बाजारात उपलब्ध होऊ शकतो. फोनची लॉंचची तारीख अद्याप समोर आलेली नाही, परंतु आगामी हँडसेटची किंमत आणि फीचर्सशी संबंधित माहिती एका रिपोर्टमध्ये समोर आली आहे. याशिवाय फोनचे फोटोही लीक झाले आहेत. आगामी फोन लावा ब्लेझ या नावाने लॉंच केला जाईल आणि चार रिअर कॅमेरे आणि युनिसॉक प्रोसेसर दिला जाऊ शकतो. याशिवाय नुकतेच लावाचे अध्यक्ष आणि बिझनेस हेड सुनील रैना यांनीही देशात ब्लेझ सीरिज सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

MySmartPrice च्या अहवालात लावा ब्लेझ स्मार्टफोनची कथित छायाचित्रे आणि किंमत उघड झाली आहे. अहवालानुसार, आगामी लावा ब्लेझची किंमत देशात सुमारे १० हजार रुपये असेल. हँडसेटची लीक झालेली छायाचित्रे सूचित करतात की डिव्हाइसला कर्व्ड डिस्प्ले मिळेल. याशिवाय, एक ग्लास बॅक पॅनेल असेल ज्यामध्ये चार मागील कॅमेरे असू शकतात. फोनमध्ये Unisoc प्रोसेसर असल्याच्याही बातम्या येत आहेत.

आणखी वाचा : Samsung चे लाख रुपयांचे महागडे स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी, ३०४२ रुपयांत घरपोच मिळणार

यापूर्वी एका लीकमध्ये असे समोर आले होते की Lava या महिन्यात लेटेस्ट बजेट स्मार्टफोन लॉंच करू शकतं. नुकतंच लावाने घोषणा केली की नवीन स्मार्टफोन ब्लेझ सीरीज अंतर्गत लॉंच केला जाईल. त्यांनी सांगितले होते की, नवीन स्मार्टफोन सीरीजची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी असेल. नवीन मॉडेलमध्ये काही दोष असल्यास घरोघरी सेवा उपलब्ध होणार असल्याचे वृत्त आहे.

आणखी वाचा : जुन्या टीव्हीला करा टाटा बाय-बाय! १४ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा Android स्मार्ट टीव्ही

याशिवाय लावाचे अध्यक्ष आणि बिझनेस हेड सुनील रैना यांनी सांगितले होते की, डिव्हाईसशी संबंधित समस्यांसाठी ग्राहकांना वेगळ्या व्यक्तीची नियुक्ती केली जाईल. Lava ने देशभरात २ हजार लोकांसह सुरुवात करण्याची योजना आखली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, डिव्हाइसमधील सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरशी संबंधित किरकोळ समस्या घरबसल्या दूर केल्या जातील, तर मोठे दोष आढळल्यास फोन दुरुस्त करून घरी परत दिला जाईल. या सेवेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही.