आजकाल स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे. आपली बरीचशी कामे स्मार्टफोनच्या मदतीने पूर्ण होतात. डिजिटल पेमेंट करणे असेल, वीजबिल भरणे असेल किंवा अन्य कामांचा समावेश यामध्ये होतो. देशामध्ये अनेक कंपन्या आपापले स्मार्टफोन लॉन्च करत आहेत ज्यात नवनवीन फीचर्सचा समावेश आहे. आज आपण  Lava Blaze Pro 5G आणि Itel S23+ या दोन फोन्सबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजेच यांच्यातील फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्समधील तुलना जाणून घेऊयात.

Itel S23+ : फीचर्स

Itel S23+ हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ च्या Itel OS 13 वर चालतो. यामध्ये वापरकर्त्यांना ६.७८ इंचाचा फुल एचडी + AMOLED कर्व्ह डिस्प्ले मिळणार आहे. ज्यामध्ये डिस्प्लेचा पीक ब्राइटनेस हा ५०० नीट्स इतका असणार आहे. सेल्फी कॅमेऱ्यासाठी डिस्प्लेमध्ये एक होल पंच कटआऊट देण्यात आला आहे. या डिस्प्लेला गोरिला ग्लास ५ चे संरक्षण दिले आहे. Itel S23+ मध्ये Unisoc T616 4G SoC चा सपोर्ट मिळणार आहे.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
150 years of India Meteorological Department
अपुरी साधनसामग्री ते अद्यायावत तंत्रज्ञान
Most consumers eye EVs as next car charging gaps remain key concern: TCS study
इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘टीसीएस’ची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी
spadex satellites successfully come 3 meters to each other says isro
‘स्पाडेक्स’ मोहिमेत दोन्ही उपग्रह तीन मीटर अंतरावर
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
Samsung Galaxy S25 Series Launch In India
Samsung Galaxy S25 : सॅमसंगचा पॉवरफूल स्मार्टफोन होणार ‘या’ तारखेला लाँच! कशी करायची प्री-बुकिंग? जाणून घ्या…

हेही वाचा : Lava ने भारतात लॉन्च केला ‘हा’ स्वस्त फोन; ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि मिळणार…

Lava Blaze Pro 5G: फीचर्स

Lava ब्लेझ प्रो ५ जी हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर चालतो. यामध्ये वापरकर्त्यांना ६.७८ इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. या डिस्पेलचा रिफ्रेश रेट हा १२० Hz एक आहे. सेल्फी कॅमेऱ्यासाठी डिस्प्लेमध्ये होल पंच कटआऊट देण्यात आला आहे. यामध्ये मिडियाटेक डायमेन्शन ६०२० SoC चा सपोर्ट देण्यात आला आहे.

Itel S23+ : कॅमेरा व स्पेसिफिकेशन्स

Itel S23+ या स्मार्टफोनमध्ये AI चा सपोर्ट असणारा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये f/1.6 अपर्चरसह ५० मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. तसेच यामध्ये २५६ जीबी इतके ऑनबोर्ड स्टोरेज दिले गेले आहे. या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, ४जी ३.५ मिमीचे ऑडिओ जॅक आणि एक यूएसबी टाइप -सी पोर्टचा समावेश आहे. तसेच यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून त्याला १८ W चे वायर्ड चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Lava Blaze Pro 5G : कॅमेरा व स्पेसिफिकेशन्स

Lava Blaze Pro 5G स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम मिळते. यामधील स्टोरेज हे १६ जीबी पर्यंत वाढवता येते. या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रिअर कॅमेरा युनिट देण्यात आले आहे. रिअर कॅमेरा सेटअपमध्ये इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशनचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन १२८ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो. हे स्टोरेज १ टीबी पर्यंत वाढवता येते.

हेही वाचा : VIDEO: Itel ने भारतात लॉन्च केला ५० मेगापिक्सलचा AI कॅमेरा असणारा ‘हा’ स्मार्टफोन; किंमत फक्त…

Itel S23+ : किंमत आणि उपलब्धता

नुकताच लॉन्च करण्यात आलेल्या Itel S23+ फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याची व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे. हा फोन तुम्हाला Elemental Blue आणि Lake Cyan या रंगात खरेदी करता येईल. सध्या या हॅण्डसेटच्या उप्लब्धतेबद्दल कोणीतही माहिती समोर आलेली नाही. Itel S23+ स्मार्टफोन या महिन्याच्या सुरुवातीला काही निवडक जागतिक बाजारांमध्ये १,४८,०० NGN (सुमारे १५,८०० रुपये) या किंमतीत लॉन्च करण्यात आले होते.

Lava Blaze Pro 5G : भारतातील किमंत आणि उपलब्धता

Lava Blaze Pro 5G हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या व्हेरिएंटची किंमत १२,४९९ रुपये असणार आहे. खरेदीदार हा फोन Radiant Pearl आणि Starry Night या दोन रुग्णामध्ये खरेदी करू शकणार आहेत. ३ ऑक्टोबरपासून हा फोन कंपनीची अधिकृत वेबसाइटवर आणि Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

Story img Loader