लावा ही एक भारतीय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन आणि स्वस्तात मस्त असे स्मार्टफोन्स लाँच करीत असते. आता कंपनीने नवीन स्मार्टफोन ब्रँड युवा ३ (Yuva 3) लाँच केला आहे; ज्यामध्ये १२८ जीबी स्टोरेज, ६.५ इंचाचा एचडी प्लस पंच होल डिस्प्ले (6.5-inch HD+ Punch Hole display) आणि स्टायलिश डिझाइन आहे.
‘लावा’चा या नवीन फोनची किंमत फक्त ९,७९९ रुपये असून, तीन रंगांच्या व्हेरिएंट आणि दोन स्टोरेज पर्यायांमध्ये तो उपलब्ध होणार आहे. Eclipse ब्लॅक, कॉस्मिक लव्हेंडर व गॅलॅक्सी व्हाइट लावा अशा तीन रंगांत आणि ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज पर्यायांमध्ये तो ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. तसेच या फोनची विक्री १० फेब्रुवारीपासून Lava e-store सुरू होईल; पण ॲमेझॉनवरून ७ फेब्रुवारीपासून ग्राहक हा नवीन स्मार्टफोन Yuva 3 खरेदी करू शकणार आहेत.
युवा ३ ( Yuva 3) या फोनसाठी प्रीमियम डिझाइन स्टॉक ॲण्ड्रॉइड १३ आणि ॲण्ड्रॉइड १४ वर गॅरंटीड अपग्रेडसह दोन वर्षांची सिक्युरिटी अपडेटदेखील मिळणार आहे. तसेच यामध्ये एक ट्रिपल एआय कॅमेरा आहे; जो आजच्या वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करतो, असे लावा इंटरनॅशनल लिमिटेडचे उत्पादनप्रमुख सुमित सिंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
युवा ३ चे फीचर्स :
नवीन स्मार्टफोन्स साइड फिंगरप्रिंट सेन्सरसह प्रीमियम बॅक डिझाइन, फोर प्लस फोर (व्हर्च्युअल) जीबी रॅम प्लस, ६४ जीबी / १२८ जीबी, यूएफएस २.२ रॅम, टाईप सी यूएसबी केबल, 18W फास्ट चार्जिंग, १३ एमपी ट्रिपल एआय रिअर कॅमेरा आहे. तसेच उत्कृष्ट फोटोग्राफीचा अनुभव आणि सेल्फीसाठी ५एमपी फ्रंट कॅमेरा, बॉटम-फायरिंग स्पीकर, सुरक्षिततेसाठी फेस अनलॉक आदी फीचर्स या स्मार्टफोनमध्ये आहेत. हा नवीन स्मार्टफोन UNISOC T606 ऑक्टा-कोर प्रोसेसर, 5000 mAh बॅटरी व 90Hz रिफ्रेश रेटद्वारे समर्थित आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार- या स्मार्टफोनमध्ये दोन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट आणि गॅरंटीड Android 14 अपग्रेडसुद्धा समाविष्ट करण्यात आले आहे.