Amazon इंडिया ही एक लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाईट आहे. यावरून खरेदीदार त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करू शकतात. या वस्तू खरेदी करत असताना त्यांना अनेक प्रकारचे डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स मिळत असतात. तसेच कंपनी ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे सेल घेऊन येत असते. अ‍ॅमेझॉन इंडियाने आपल्या आगामी फेस्टिव्हल सेल म्हणजेच ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२३ हा  ८ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. खरेदीदार या सेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. Amazon प्राइमचे सदस्य असणाऱ्या ग्राहकांना या सेलमध्ये ७ ऑक्टोबरपासूनच प्रवेश मिळणार आहे.

यावर्षी अ‍ॅमेझॉन स्मार्टफोन, टीव्ही, टॅबलेट , इअरफोन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर आकर्षक ऑफर्स आणि डिस्काउंट देण्याच्या तयारीत आहे. वेबसाइटने याआधीच वापरकर्त्यांना काही ऑर्सबद्दल सांगितले आहे. ज्यामध्ये निवडक गोष्टींवर ८९ टक्के बचतीबाबत खुलासा करण्यात आला आहे. तसेच एसबीआय कार्ड असणाऱ्यांना १० टक्के डिस्काऊंटचा लाभ घेता येणार आहे. तथापि ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२३ आधी प्लॅटफॉर्मने आपल्या “किकस्टार्टर डील” चा भाग म्हणून काही ऑफरचे अनावरण केले आहे.या ऑफर्स मर्यादित काळासाठी उपलब्ध आहेत. जर का तुम्ही एखादे नवीन गॅजेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या सवलतीवर उपलब्ध असलेल्या गॅजेट्सबद्दल जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Alina Alam who brings rightful employment to the disabled
दिव्यांगांना हक्काचं काम मिळवून देणारी अलीना…
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Established 40 years ago Bliss GVS Pharma Limited is emerging pharmaceutical manufacturing company
माझा पोर्टफोलियो, घसरणीच्या काळातील आरोग्यवर्धन: ब्लिस जीव्हीएस फार्मा लिमिटेड
chennai based firm gifted cars to employees
Diwali Gift : बॉस असावा तर असा! ‘या’ कंपनीने दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना भेट दिली मर्सिडीज बेन्झ
forex market trading fraud
फॉरेक्स मार्केट ट्रेडींगच्या नावाखाली शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक, गुन्हे शाखेची कॉल सेंटरवर कारवाई, १४ जणांना अटक
Flipkart Big Shopping Utsav 2024 In Marathi
वॉशिंग मशीन, टीव्हीवर सूट तर क्रेडिट कार्डवर कॅशबॅक; वाचा फ्लिपकार्टच्या Big Shopping Utsav मध्ये काय असणार खास?
Pune Municipal Corporation has been hit by the Smart City project
पुणेकरांना ४४ कोटींचा ‘स्मार्ट’ हिसका, काय आहे प्रकरण!
Samsung Festive Offers On Galaxy Z Fold6 and Z Flip6 Smartphones
Samsung च्या ‘या’ दोन फोल्डेबल स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर; नो कॉस्‍ट ईएमआय, अपग्रेड बोनस, कॅशबॅकचाही मिळेल आनंद

हेही वाचा : Amazon Great Indian Festival Sale 2023: अवघ्या ४० हजारांत खरेदी करा ‘हा’ iPhone

सॅमसंग Galaxy S23 अल्ट्रा

अ‍ॅमेझॉन सध्या सॅमसंग Galaxy S23 अल्ट्रा सह सॅमसंग Galaxy S23 सिरीजमधील सर्व मॉडेल्सवर १७ टक्क्यांची सूट देत आहे. सॅमसंग Galaxy S23 ची मूळ किंमत १,४९,९९९ रुपये असून साध्य तो १,२४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सॅमसंग Galaxy S23 अल्ट्रा खरेदी करत असताना तुम्हाला ३७,५०० रुपयांचा एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. या डिव्हाइसमध्ये ६.८ इंचाचा डिस्प्ले, अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टीम, स्नॅपड्रॅगन ९ en 2 SoC प्रोसेसर, २०० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरासह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. तसेच सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.

मोटोरोला Razr 40

मोटोरोला Razr 40 जा जुलैमधील amazon सेलमध्ये लॉन्च करण्यात आला होता. सध्या यावर ४९ टक्के डिस्काउंट मिळणार आहे. हा स्मार्टफोन ८ जीबी रॅम आणि २५६ स्टोरेज या एकाच व्हेरिएंटमध्ये येतो. याची मूळ किंमत ८९,९९ रुपये असून सध्या तो ४९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन खरेदी करताना तुम्हाला ४२,५०० रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. हा फोन अँड्रॉइड १३ आधारित MyUX ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. यामध्ये ६.९ इंचाचा फुल एचडी + pOLED प्रायमरी डिस्प्ले मिळतो. यामध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 SoC प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो.

हेही वाचा : Tech Tips: तुमचा फोन चोरीला गेल्यास WhatsApp वरील चॅट्स कसे मिळवायचे? ‘या’ आहेत सोप्या टिप्स

Lava Agni 2

लावा अग्नी २ या स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये मिडियाटेक डायमेन्शन ७०५० चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यामध्ये वापरकर्त्यांना ५० मेगापिक्सलचा क्वाड रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. या फोनची मूळ किंमत २१,९९९ रुपये आहे. सध्या हा स्मार्टफोन बँक ऑर्ससह Amazon वर १९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म इअरफोन्स, लॅपटॉप, पीसी, स्मार्टवॉच आणि स्मार्ट टीव्हीसह अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर डिस्काउंट देत आहे. Amazon चा प्रतिस्पर्धी फ्लिपकार्ट देखील आपला बिग बिलियन डेज सेल २०२३ सेलची तयारी करत आहे. हा सेल ८ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. फ्लिपकार्ट प्लस सदस्य असणाऱ्यांसाठी सेल ७ तारखेपासून सुरु होईल.