Amazon इंडिया ही एक लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाईट आहे. यावरून खरेदीदार त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करू शकतात. या वस्तू खरेदी करत असताना त्यांना अनेक प्रकारचे डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स मिळत असतात. तसेच कंपनी ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे सेल घेऊन येत असते. अॅमेझॉन इंडियाने आपल्या आगामी फेस्टिव्हल सेल म्हणजेच ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२३ हा ८ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. खरेदीदार या सेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. Amazon प्राइमचे सदस्य असणाऱ्या ग्राहकांना या सेलमध्ये ७ ऑक्टोबरपासूनच प्रवेश मिळणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यावर्षी अॅमेझॉन स्मार्टफोन, टीव्ही, टॅबलेट , इअरफोन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर आकर्षक ऑफर्स आणि डिस्काउंट देण्याच्या तयारीत आहे. वेबसाइटने याआधीच वापरकर्त्यांना काही ऑर्सबद्दल सांगितले आहे. ज्यामध्ये निवडक गोष्टींवर ८९ टक्के बचतीबाबत खुलासा करण्यात आला आहे. तसेच एसबीआय कार्ड असणाऱ्यांना १० टक्के डिस्काऊंटचा लाभ घेता येणार आहे. तथापि ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२३ आधी प्लॅटफॉर्मने आपल्या “किकस्टार्टर डील” चा भाग म्हणून काही ऑफरचे अनावरण केले आहे.या ऑफर्स मर्यादित काळासाठी उपलब्ध आहेत. जर का तुम्ही एखादे नवीन गॅजेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या सवलतीवर उपलब्ध असलेल्या गॅजेट्सबद्दल जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
हेही वाचा : Amazon Great Indian Festival Sale 2023: अवघ्या ४० हजारांत खरेदी करा ‘हा’ iPhone
सॅमसंग Galaxy S23 अल्ट्रा
अॅमेझॉन सध्या सॅमसंग Galaxy S23 अल्ट्रा सह सॅमसंग Galaxy S23 सिरीजमधील सर्व मॉडेल्सवर १७ टक्क्यांची सूट देत आहे. सॅमसंग Galaxy S23 ची मूळ किंमत १,४९,९९९ रुपये असून साध्य तो १,२४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सॅमसंग Galaxy S23 अल्ट्रा खरेदी करत असताना तुम्हाला ३७,५०० रुपयांचा एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. या डिव्हाइसमध्ये ६.८ इंचाचा डिस्प्ले, अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टीम, स्नॅपड्रॅगन ९ en 2 SoC प्रोसेसर, २०० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरासह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. तसेच सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.
मोटोरोला Razr 40
मोटोरोला Razr 40 जा जुलैमधील amazon सेलमध्ये लॉन्च करण्यात आला होता. सध्या यावर ४९ टक्के डिस्काउंट मिळणार आहे. हा स्मार्टफोन ८ जीबी रॅम आणि २५६ स्टोरेज या एकाच व्हेरिएंटमध्ये येतो. याची मूळ किंमत ८९,९९ रुपये असून सध्या तो ४९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन खरेदी करताना तुम्हाला ४२,५०० रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. हा फोन अँड्रॉइड १३ आधारित MyUX ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. यामध्ये ६.९ इंचाचा फुल एचडी + pOLED प्रायमरी डिस्प्ले मिळतो. यामध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 SoC प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो.
Lava Agni 2
लावा अग्नी २ या स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये मिडियाटेक डायमेन्शन ७०५० चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यामध्ये वापरकर्त्यांना ५० मेगापिक्सलचा क्वाड रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. या फोनची मूळ किंमत २१,९९९ रुपये आहे. सध्या हा स्मार्टफोन बँक ऑर्ससह Amazon वर १९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म इअरफोन्स, लॅपटॉप, पीसी, स्मार्टवॉच आणि स्मार्ट टीव्हीसह अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर डिस्काउंट देत आहे. Amazon चा प्रतिस्पर्धी फ्लिपकार्ट देखील आपला बिग बिलियन डेज सेल २०२३ सेलची तयारी करत आहे. हा सेल ८ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. फ्लिपकार्ट प्लस सदस्य असणाऱ्यांसाठी सेल ७ तारखेपासून सुरु होईल.