Lava ही एक भारतीय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स ल्रॅान्च करत असते. मागच्याच महिन्यात lava ने त्यांचा Lava Yuva 2 Pro हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा असा स्मार्टफोन आहे जो जवळजवळ प्रत्येक व्यक्ती खरेही करू शकतो. जर हा फोन तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज दुपारी (१५ मार्च) १२ वाजल्यापासून भारतात Amazon वर या स्मार्टफोनची ऑनलाईन विक्री सुरु झाली आहे. Lava Yuva 2 Pro हा कमी किमतीचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Lava Yuva 2 Pro हा स्मार्टफोन जर तुम्हाला फोन ऑनलाइन खरेदी करायचा नसेल तर ऑफलाइन स्टोअरमध्येही फोन उपलब्ध आहेत. याशिवाय लावा इंडियाच्या स्टोअरमधूनही हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनचे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

हेही वाचा : Tech Layoffs: वोडाफोनचा मोठा निर्णय; ‘या’ देशात होणार १००० कर्मचाऱ्यांची कपात

Lava Yuva 2 या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ६.५ इंचाचा एलसीडी डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. तसेच Helio G37 चिपसेट चा प्रोसेसर या फोनमध्ये देण्यात आला आहे. या फोनमध्ये तुम्हाला ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज वापरायला मिळणार आहे. या फोनचा डिस्प्ले हा एचडी+ रिझोल्युशनसह येतो. याच्या रिफ्रेश रेट हा ६०Hz इतका आहे. तसेच यामध्ये व्हर्च्युअल रॅमची सुविधा मिळणार आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि दोन VGA कॅमेरे आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी तुम्हाला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे. या फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी आणि आणि १०W चा टाईप-सी यूएसबी पोर्ट दिला आहे. हा स्मार्टफोन Android 12 OS वर काम करतो.

काय आहे किंमत ?

Lava Yuva 2 Pro या स्मार्टफोनची किंमत ७,९९९ रूपये इतकी आहे. त्याच किंमतीत हा फोन Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा फोन तुम्हाला तीन रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. ज्यामध्ये Glass White, Glass Green आणि Glass Lavender याचा समावेश आहे. Lava ने त्याच्या नवीन स्मार्टफोनसाठी Doubtnut या शैक्षणिक संस्थेशी भागीदारी केली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lava yuva 2 pro sale start today on amazon low price buy for students know all details tmb 01