Oracle Layoff: मागील काही महिन्यांपासून अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. फेसबुक, ट्विटर, गुगल अशा टेक कंपन्यांमध्येही कर्मचाऱ्यांची कपात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दर महिन्याला विविध कंपन्यांना त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे अशा बातम्या कानांवर पडत आहे. याच धर्तीवर ओरॅकल या कंपनीने ३,००० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केल्याची माहिती बिझनेस इनसाइडरद्वारे शेअर करण्यात आली आहे.
स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओरॅकल कंपनीने कर्मचाऱ्यांची कपात करण्यासह कर्मचाऱ्यांची पगारवाढ तसेच प्रमोशन करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. वर्षभर याच अटींवर काम करावे, कोणत्याही प्रकारची अपेक्षा करु नये असे कंपनीने कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. यावरुन ओरॅकल कंपनीवर आर्थिक संकट आले आहे असा अंदाज लोक लावत आहेत. या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने तपशीलवार मार्केटिंग, इंजिनीअरिंग, अकाउंट्स आणि प्रोडक्शन अशा विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहे.
आणखी वाचा – तुम्ही पण फोनमध्ये डार्क मोड सुरु ठेवताय? जाणून घ्या शरीरासाठी योग्य आहे का अयोग्य
ओरॅकल कंपनीद्वारे याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. असे असले तरी स्त्रोताचा दावा आहे की, या प्रकरणाची माहिती असलेल्या ओरॅकल कंपनीतील काही अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. याव्यतिरिक्त नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनी भरपाई देणार आहे की नाही हे अजूनही गुलदस्त्यात आहे. आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी ओरॅकल कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची कपात होत असावे असे लोक म्हणत आहेत. ओरॅकलपूर्वी अॅमेझॉन, ट्विटर, गुगल, मेटा यांसारख्या मोठ्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना नारळ मिळाला होता.