Iphone 15 ultra price leak : आयफोन १४ सिरीज लाँच झाल्यानंतर तीन महिन्यांनी आयफोन १५ लाँच बाबतच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही अहलवालांनुसार, हा फोन २०२३ मध्ये लाँच होऊ शकतो. मात्र, त्या अगोदरच काही लिक्समधून त्याच्याबाबत माहिती पुढे येत आहे. यामुळे चाहत्यांची या फोनबाबत उत्कंठा आणखी वाढली आहे. अलीकडेच या स्मार्टफोनमध्ये यूएसबी टाइप सी चार्जर मिळणार की नाही? हा मुद्दा अहवालांतून मांडण्यात आला होता. आता फोनची किंमत आणि फीचर लिक झाले आहेत.

apple iphone 15 ultra ची किंमत अ‍ॅपल ‘आयफोन १४ प्रो’पेक्षा २०० रुपयांनी अधिक असेल, असे एका अहवालातून सांगण्यात आले आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, आयफोन १५ अल्ट्रा हा स्मार्टफोन जवळपास १ लाख ८ हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये उपलब्ध होऊ शकतो, असे LeaksApplePro चे म्हणणे आहे. या फोनच्या किंमतीची तुलना आयफोन १४ प्रो मॅक्सशी करण्यात आली आहे. जर लिक खरी असेल तर apple iphone 15 किंमत ही ‘आयफोन १४ प्रो’पेक्षा २०० डॉलर अधिक असेल.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!

(ANDROID युजर्ससाठी आनंदाची बातमी! नवीन फीचर्ससह MIUI 14 UPDATE जारी; ‘या’ स्मार्टफोन्सना आधी मिळणार)

अहवालानुसार, आयफोन १५ अल्ट्राचे १ टीबी मॉडेल १ लाख ४९ हजार २७ रुपयांपर्यंत असेल. लिक्स अ‍ॅपल प्रो नुसार आयफोन १५ अल्ट्रामध्ये कमीत कमी २५६ जीबी स्टोअरेज मिळेल.

तुम्ही आयफोन १५ अल्ट्राऐवजी जर आयफोन १५ किंवा आयफोन १५ प्रो किंवा प्लस घेण्याचा विचार करत असाल, तर त्यांची देखील किंमत वाढण्याची शक्यता आहे. महाग उत्पादन प्रक्रिया आणि कच्चा माल, त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून आयफोनचे घटत चाललेले मार्जिन याची अ‍ॅपलला असलेली चिंता या सर्वांमुळे किंमती वाढू शकतात.

SAMSUNG युजर्स सावधान, १ मिनिटांपेक्षा कमी वेळेत हॅक झाला ‘हा’ फोन, तुमच्याकडे तर नाही ना? चेक करा

किंमतीसह ‘लिक्स अ‍ॅपल प्रो’ने इतर काही खुलासे देखील केले आहेत. आयफोन १५ अल्ट्रा हा टायटेनियमने बनलेला असेल असे ऑक्टोबर महिन्यात ‘लिक्स अ‍ॅपल प्रो’ने सांगितले होते. त्याचबरोबर, अ‍ॅपलच्या नवीन मॉडेलमध्ये ड्युअल फ्रंट फेसिंग कॅमेरा, थंडरबोल्ट ४ सह यूएसबी सी असेल, असे देखील सांगितले होते.