दुकान, मॉल, हॉटेलमध्ये गेल्यावर आपण काय खरेदी केलं, आपण काय खाल्लं हे नंतर नावासकट एका कागदावर नमूद करून आपल्याकडे सोपवलं जातं याला बिल, असे म्हणतात. तर हे बिल आपल्याला महिन्याचा किती खर्च झाला याचा हिशोब करण्यासही फायदेशीर ठरते. पण, तुम्हाला माहिती आहे का? उबर सेवासुद्धा तुमच्या प्रवासाचे बिल तुमच्यापर्यंत सुखरूप पोहोचवते.
आजकाल अनेक जण लोकप्रिय कंपनी उबरने प्रवास करणाऱ्याला प्राधान्य देतात. शहरातील छोट्या सहलीपासून ते अगदी वीकेंडला बाहेर फिरायला जाण्यासाठी उबर कार भाड्यानेसुद्धा दिली जाते. तसेच Uber वैयक्तिक ऑडिटिंगसाठी आणि कार्यालयात सबमिट करण्यासाठी एक बिलसुद्धा तुमच्या मेलवर पाठवून देते.
तुम्ही जर वारंवार कॅबने प्रवास करीत असाल. तर उबर कॅब हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे; ज्यामुळे तुम्हाला राइड्सवर खर्च केलेल्या पैशांचा मागोवा घेण्यास सहज मदत मिळू शकते. तुम्ही कामावर जाण्यासाठी कॅब बुक करीत असाल किंवा ऑफिसमधील एखाद्या कामासाठी कॅब बुक करीत असाल, तर उबर तुमचा किती खर्च झाला याची पावतीसुद्धा तुम्हाला देते. ही पावती व्यावसायिक खर्च दाखविण्यासाठीही वापरली जाऊ शकते.
सगळ्यात बेस्ट म्हणजे उबरला पेमेंट करणेदेखील खूप सोपे आहे. तुम्ही यूपीआय, क्रेडिट आणि डेबिट कार्ड या दोन्ही डिजिटल पेमेंटद्वारे किंवा रोख रक्कम वापरूनदेखील पेमेंट करू शकता. तसेच पीडीएफ फॉरमॅटमध्ये किती भाडे झाले याची पावती जारी करते. त्यामुळे ग्राहकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
उबरच्या प्रवासादरम्यान पावती मिळविण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा :
उबरद्वारे पावती मिळविणे ही एक सरळ प्रक्रिया आहे. खासकरून जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर उबर ॲप इन्स्टॉल केले असेल, तर ही प्रक्रिया Android किंवा iOS डिव्हाइससाठी आहे.
१. तुमच्या फोनवर उबर ॲप उघडा.
२. ‘Activity’वर जा आणि तुम्हाला ज्या राइडची पावती मिळवायची आहे, ती राईड निवडा.
३. एखाद्या राइडवर क्लिक करा आणि ‘पावती’ बटण दाबा. जे बिल आणि पेमेंट मोडसह तुमच्या प्रवासाची सर्व माहिती दाखवेल. याच पेजवर तुम्हाला पावती डाउनलोड करता येईल.
४. नंतर ही पावती ईमेलद्वारे मिळविण्यासाठी, ‘ईमेलवर पुन्हा पाठवा’ बटणावर क्लिक करा. लक्षात ठेवा ॲपवर उघडताना तुम्ही तेथे जो ईमेल आयडी टाकला आहे त्याच मेलवर ही पावती शेअर केली जाऊ शकते.तसेच हा ईमेल इतर कोणाशीही तुम्ही शेअर करू शकत नाही. तर या स्टेप्स फॉलो करून, तुम्ही ईमेलद्वारे तुमची हक्काची पावती मिळवू शकता.