मोबाईल वर्ल्ड काँग्रेस म्हणजेच MWC २०२३ हा या वर्षातील सर्वात मोठा मोबाईल शो आहे. हा शो २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीमध्ये होणार आहे. या शो मध्ये खरेतर अनेक स्मार्टफोन्स कंपन्या आपले नवीन मॉडेल्स लॉन्च करणार आहेत. काही स्मार्टफोन्स लॉन्च देकील झाले आहेत. मात्र या शो मध्ये फक्त स्मार्टफोन्स नव्हे तर लॅपटॉप देखील लॉन्च करण्यात आले आहेत.
हा लॅपटॉप lenovo कंपनीने लॉन्च केला आहे. Lenovo ने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस शोमध्ये ThinkPad Z13 आणि Z16 Gen 2 लॅपटॉप लॉन्च केले आहेत. याशिवाय Lenovo ThinkCentre TIO Gen 5 मॉनिटर देखील घरगुती वापरकर्त्यांसाठी लॉन्च करण्यात आला आहे. या लॅपटॉप आणि मॉनिटरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Z13 Gen 2 आणि Z16 Gen 2 चे फीचर्स
लेनोवोच्या दोन्ही लॅपटॉपमध्ये WUXGA (१,९२० x १,२००) IPS LCD, WQXGA (२.८K) OLED आणि WQUXGA (4K) OLED हे डिस्प्ले मिळणार आहेत. दोन्ही लॅपटॉपच्या स्क्रीनची पीक ब्राईटनेस हा ४०० निट्स इतका आहे व त्यामध्ये टच सपोर्ट देखील देण्यात आला आहे. चांगले प्रदर्शन करण्यासाठी लॅपटॉपमध्ये AMD Ryzen 7000 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच Z16 मध्ये 72Wh ची बॅटरी आहे, तर Z13 मध्ये 51.5Wh ची बॅटरी वापरकर्त्यांना मिळणार आहे.
या लॅपटॉप्सच्या ग्राफिक्स कार्डबद्दल बोलायचे झाल्यास Z13 Gen 2 लॅपटॉप मध्ये Radeon GPU आणि Z16 Ball 2 मध्ये RX 6500M GPU ग्राफिक्स कार्ड देण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, दोन्ही लॅपटॉपमध्ये USB 4.0 पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक आणि SD कार्ड रीडर आहे. तसेच २ टीबी पर्यंत इंटर्नल स्टोरेज असून ६४ जीबी इतकी LPDDR5x रॅम देण्यात आली आहे.
Z13 Gen 2 आणि Z16 Gen 2 लॅपटॉपची काय आहे किंमत ?
Lenovo Z13 Gen 2 या लॅपटॉपची सुरुवातीची किंमत १,६४९ युरो(अंदाजे १,४४,२०५ रुपये ) आहे. त्याची विक्री जुलै २०२३ पासून सुरु होणार आहे. तर Z16 Gen 2 लॅपटॉपची किंमत १,९५९ युरो(अंदाजे १,७१,२८३ रुपये ) आहे. या लॅपटॉपची विक्री ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे.