Lenovo ThinkBook Plus Gen 3 Laptop: लेनोवा कंपनीने बाजारात दोन डिस्प्लेसह ‘Lenovo ThinkBook Plus Gen 3’ लॅपटॉप लाँच केला आहे. यात तुम्हाला दोन डिस्प्ले मिळतील. पहिला डिस्प्ले १७.३ इंचाचा आहे तर दुसरा ८-इंचाचा टच डिस्प्ले आहे. ड्युअल डिस्प्ले असलेला हा लॅपटॉप लोकांना कामाच्या ठिकाणी उत्पादकता वाढवण्यास मदत करेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.या लॅपटॉपमध्ये मिळणारा दुय्यम डिस्प्ले मोबाईल फोनमध्ये मिळणाऱ्या डिस्प्लेपेक्षा मोठा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Lenovo ThinkBook Plus Gen 3 लॅपटॉपमध्ये काय आहे खास?

Lenovo ThinkBook Plus Gen 3 मध्ये तुम्हाला १७.३ इंचाचा अल्ट्रा वाइड डिस्प्ले मिळेल जो १२०hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. दुय्यम डिस्प्लेबद्दल बोलायचे तर हा ८-इंचाचा HD रिझोल्यूशन डिस्प्ले आहे. दोन्ही स्क्रीन टच सपोर्टसह येतात. म्हणजेच ज्या पद्धतीने तुम्ही मोबाईल फोनला स्पर्श करून ऑपरेट करता, त्याच पद्धतीने तुम्ही लॅपटॉपच्या दोन्ही स्क्रीन ऑपरेट करू शकाल.

(हे ही वाचा : आता स्मार्टफोनसोबत ‘ही’ आगळी वेगळी वस्तू मिळत आहे मोफत! वाचा ती फायदेशीर आहे की नाही? )

Lenovo च्या लॅपटॉपमध्ये तुम्हाला 12th-Gen Intel Core i7-12700H प्रोसेसर मिळतो, ज्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेटेड इंटेल Iris Xe ग्राफिक्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच यामध्ये १६GB रॅम आणि १TB SSD चा सपोर्टही देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये तुम्हाला 2W आउटपुट आणि Dolby Atmos सपोर्टसह ड्युअल स्पीकर मिळतात. तुम्ही Lenovo ThinkBook Plus Gen 3 फक्त राखाडी रंगात खरेदी करू शकता. लॅपटॉप ६९Wh बॅटरी सपोर्टसह येतो जो ६.५ तासांपर्यंत टिकू शकतो. लॅपटॉपमध्ये, तुम्हाला एक HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट आणि एक USB C पोर्ट मिळेल.

Lenovo ThinkBook Plus Gen 3 किंमत

Lenovo ThinkBook Plus Gen 3 लॅपटॉपची किंमत १,९४,९९० रुपये आहे. तुम्ही कंपनीच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन चॅनेलद्वारे ते खरेदी करू शकता. कारण ते नुकतेच लाँच केले गेले आहे, यामुळे त्याची सूची ई-कॉमर्स वेबसाइटवर केली गेली नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lenovo on unveiled a new laptop thinkbook plus gen 3 which is available at a price of rs 194990 in india pdb