इंटरनेटवर फेक प्रोफाइल्स मोठ्या प्रमाणात वाढल्याचे एका कंपनीच्या कारवाईतून दिसून आले आहे. अहवालानुसार, लिंक्डइनने तब्बल ६ लाख बनावट प्रोफाइलवर कारवाई केली आहे. या सर्व प्रोफाइल्समध्ये अॅपल कंपनीला नियोक्ता (इम्प्लॉयर) म्हणून दाखवण्यात आले होते. गेल्या २४ तासांत अॅपलला नियोक्ता म्हणून दाखवणाऱ्या ५० टक्के प्रोफाइल्स लिंक्डइनने हटवल्या आहेत. बनावट आणि स्पॅम अकाउंटना चाप देण्याच्या दृष्टीने लिंक्डइनकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
लिंक्डइनमध्ये डेव्हलपर म्हणून काम करणारे जे पिन्हो यांनी पहिल्यांदा लिंक्डइनवर अॅपल आणि अमेझॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. पिन्हो हे मोठ्या संस्थांमधील दैनंदिन कर्मचाऱ्यांच्या संख्येचे निरीक्षण करतात. त्यांनी लिंक्डइनवरील सुरक्षेबाबत क्रेब या सायबर सुरक्षा ब्लॉगला माहिती दिली.
(सॅमसंगचा ‘हा’ महागडा 5G फोन मिळेल केवळ ३१ हजारात, जाणून घ्या दिवाळी ऑफर)
अमेझॉन नियोक्ता असल्याचा दावा करणारे १.२५ मिलियन खात्यांची संख्या एका दिवसांत ८ लाख, ३८ हजार ६०१ झाल्याची माहिती पिन्हो यांनी दिली. तसेच अॅपलमध्ये काम करत असल्याचा दावा करणाऱ्या प्रोफाइल्समध्ये १० ऑक्टोबर रोजी ५० टक्क्यांची घट झाली आहे, असेही पिन्हो यांनी सांगितले.
प्रोफाइल्सच्या संख्येमध्ये का घट झाली, याबाबत लिंक्डइनने स्पष्टीकरण दिले आहे. फेक अकाउंट हटवल्याने प्रोफाइल्समध्ये घट झाल्याचे लिंक्डइनने सांगितले आहे. बायनान्स या क्रिप्टो एक्सचेंज कंपनीच्या सीईओने ट्विटरवर एक खुलासा केला होता. त्यामध्ये लिंक्डइनवर बायनान्स कंपनीच्या ७ हजार कर्मचाऱ्यांचे प्रोफाइल असून त्यातील केवळ ५० प्रोफाइलच खरे असल्याचे सांगण्यात आले होते. सीईओने स्कॅमर्सपासून सावध राहायचे सांगितले होते. आर्थिक फसवणूक करण्यासाठी लिंक्डइनवर अनेकदा बनावट प्रोफाइल तयार केले जातात.
(स्मार्टफोन घ्यायचा आहे? बेस्ट डिल्स, सूटबाबत ‘या’ एकाच संकेतस्थळावर मिळेल सर्व माहिती)
फेक अकाउंटवर लिंक्डइनचे प्रवक्ता ग्रेग स्नॅपर यांनी इन्साइडरला स्पष्टीकरण दिले आहे. आमच्या प्लॅटफॉर्मवर बनावट खाती थांबवण्यासाठी आम्ही नियमितपणे कारवाई करतो आणि ते ऑनलाइन येण्यापूर्वी सिस्टममध्ये सतत सुधारणा करत असतो, अशी माहिती ग्रेग यांनी दिली.