नोकरी शोधण्यासाठी सोशल मीडियावर अनेक ॲप्स आहेत. यामध्ये लिंक्डइन (LinkedIn) चा सुद्धा समावेश आहे. येथे बरेच जण नोकरी शोधण्यासाठी लिंक्डइनचा वापर करतात. लिंक्डइनवर अनेक प्रोफेशनल लोकांचे अकाउंट आहे. प्रोफेशनल लोकांशी कनेक्ट राहण्यासाठी सहसा या ॲपचा वापर केला जातो. तर आता LinkedIn युजर्ससाठी काही एआय (AI) फीचर्स घेऊन आली आहे. यामध्ये तुम्हाला नोकरी शोधणे, रिझ्युमे बनवणे, प्रोफेशनल लोकांशी वैयक्तिक सल्ला घेणे शक्य होणार आहे.
LinkedIn नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) फीचर्स आणत आहे ; जे युजर्सना प्लॅटफॉर्मवर नोकरी शोधण्यात आणि वैयक्तिक शिकण्यास मदत करेल. LinkedIn ने गुरुवारी जाहीर केल्यानुसार, एआय फीचर्समध्ये एक जॉबसीकर कोच (Jobseeker Coach) असणार आहे ; जो मजकूर प्रॉम्प्टवरून युजर्ससाठी योग्य नोकरी शोधू शकतो. म्हणजेच युजर्सना आवडत्या नोकरीसाठी फक्त एक प्रॉम्प्ट द्यावा लागेल. त्यानंतर एआय टूल तुम्हाला कीवर्डशी संबंधित जॉब दाखवेल. सध्या हे टूल फक्त इंग्रजी भाषेला सपोर्ट करते आहे.
LinkedIn चे नवीन AI फीचर्स –
हे एआय फीचर्स युजर्सना रिझ्युमे आणि ऍप्लिकेशन्सचे रिव्ह्यू करण्याचे टूल (review tool) , एक चॅटबॉट जो तुम्हाला कव्हर लेटर तयार करण्यासाठी तर प्रोफेशनल सल्ला (professional advice) देण्यात मदत करेल. ही फीचर्स सध्या प्लॅटफॉर्मच्या प्रीमियम वापरकर्त्यांसाठी जागतिक स्तरावर आणली जाणार आहेत.
एआय फिचर्सचा वापर कसा केला जाईल?
आता लिंक्डइनवर एआय सपोर्ट असलेला चॅटबॉटही आला आहे. हा चॅटबॉट नोकऱ्या देखील शोधेल आणि नोटीफीकेशन्सच्या आधारे तुम्हाला माहिती देईल. उदाहरणार्थ,’माझ्यासाठी सायबर सिक्युरिटीमध्ये नोकरी शोधा’ असा तुम्ही एक प्रॉम्प्ट जरी दिला तर त्याविषयी एआय चॅटबॉट तुम्हाला काही पर्याय सुचवेल. या एआय बॉट्सना वास्तविक तज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाते, असा दावा कंपनीने केला आहे.
तज्ज्ञांचा सल्ला (Expert advice) –
प्लॅटफॉर्म व्यावसायिकांना सल्ला आणि नवीन कौशल्ये शिकण्यास मदत करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला हे एक नवीन फीचर घेऊन येत आहे. म्हणजेच लिंक्डइन प्रीमियम युजर्स बिझनेस लीडर्स आणि प्रशिक्षकांकडून वैयक्तिक सल्ला घेऊ शकतात.
तसेच पर्सनलाइझ कोचिंग फीचर युजर्सना प्लॅटफॉर्मवर नवीन कोर्सेस बद्दल माहिती देण्यास मदत करेल. ते कन्टेन्ट summary , विशिष्ट विषयांवरील स्पष्टीकरण किंवा रीअल-टाइम समस्या किंवा एखादे उदाहरणे विचारण्यास सक्षम असतील. LinkedIn ने वापरकर्त्यांसाठी एआय फीचर्स आणण्यास सुरुवात केली आहे. पण, हे फीचर्स सगळ्या युजर्ससाठी लागू होण्यास काही दिवस लागू शकतात.