व्यावसायिक जगात ‘लिंक्डइन’ हे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म नेहमीच चर्चेत असते. ‘लिंक्डइन’ने एक स्वत:ची ओळख बनवली आहे. अनेक लोक व्यवसाय-नोकरीच्या शोधात ‘लिंक्डइन’वर आपलं नशीब आजमावत आहेत.अशाच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता ‘लिंक्डइन’ने एक नवीन टूल आणले आहे, ज्याद्वारे जॉब शोधण्यास त्यांना मदत होणार.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या नव्या टूलमध्ये जॉब व्हेरिफिकेशन, प्रोफाइल व्हेरिफिकेशन आणि मेसेज वॉर्निंगचा समावेश आहे. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

‘लिंक्डइन’ आता जॉब पोस्टसंबंधित व्हेरिफिकेशन दाखवणे सुरू करणार आहे, ज्यामध्ये जॉब पोस्ट करणाऱ्या कंपनीची व्हेरिफाइड माहिती दिसणार आहे; ज्यामुळे जॉब फसवणुकीपासून तुम्ही स्वत:ला वाचवू शकणार आहात आणि ही जॉब पोस्टसुद्धा अधिकृत कंपनीकडून शेअर करण्यात आली आहे की नाही याची खात्री होणार आहे.

जॉब व्हेरिफिकेशन

हे नवीन व्हेरिफिकेशन जॉबच्या शोधात असणाऱ्यांना आत्मविश्वास देणारे आहे. यामुळे कंपनी आणि जॉबसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये विश्वसार्हता वाढणार आहे.
‘लिंक्डइन’च्या मते जॉब पोस्टवरील व्हेरिफिकेशन लवकरच सुरू होणार आहे, जे मोफत असणार आहे; ज्यामुळे जॉब शोधण्यास अधिक मदत होणार आहे.

हेही वाचा : Wi-Fi Speed : तुमच्या ‘या’ चुकांमुळे Wifi चं स्पीड होतं कमी? ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका…

प्रोफाइल व्हेरिफिकेशन

याशिवाय प्रोफाइल व्हेरिफिकेशनमध्ये ‘लिंक्डइन’ युजरला जॉबसाठी अर्ज करताना त्या विशिष्ट कंपनीची ओळख, ई-मेल आयडी आणि वर्कप्लेसची माहिती व्हेरिफाइड करण्यास मदत करणार आहे.

हेही वाचा : अ‍ॅपलच्या iPhone 15 Pro Max आणि MacBook Air मध्ये दिसणार ‘हे’ खास फीचर्स

मेसेज वॉर्निंग

मेसेज वॉर्निंग टूलमध्ये ‘लिंक्डइन’ युजरला वाॅर्निंग देणार की समोरची कंपनी तुमच्यासाठी योग्य आहे की नाही. म्हणजेच स्पॅम मेसेजपासून ‘लिंक्डइन’ सावध करणार. सोबतच ही वाॅर्निंग तुम्हाला समोरच्या स्पॅम कंपनीविरोधात तक्रार करण्याचाही पर्याय देणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Linkedin rolls out new tool helps job seekers to find out jobs on linkdin with the help of job verifications profile verifications and message warnings ndj