Earbuds Under 1000 Amazon : तुम्ही इअरबड्स घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट केवळ १००० रुपयांपर्यंतचे असेल तर अमेझॉनवर काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत. हजार रुपयांखाली मिळणारे हे इअरबड्स तुम्ही नवीन वर्षानिमित्त गिफ्ट करू शकता किंवा स्वत:साठी खरेदी करू शकता. कोणते आहेत हे इअरबड्स? जाणून घेऊया.
१) ओरायमो रॉक इन वायरलेस इअरबड्स
अमेझॉनवर ‘Oraimo Rock in True Wireless Earbuds’ची किंमत १९९९ रुपये आहे. मात्र, त्यावर ५० टक्के सूट देण्यात आल्याने आता हे इअरबड्स ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध झाले आहेत. इअरबड्स वॉटरप्रुफ असून ते २४ तासांचा प्लेबॅक टाईम देतात. इअरबड्समधून शक्तीशाली बेस आणि स्पष्ट आवाज ऐकू येते, असे अमेझॉनवरून सांगण्यात आले आहे. इअरबड्समध्ये ईएनसी फीचर असल्याने कॉलवर असलेल्या व्यक्तीला स्पष्ट आवाज ऐकू येते.
(Galaxy Z Flip 3 स्मार्टफोनवर चक्क २३ हजारांची सूट, आणखी १७ हजारांची होऊ शकते बचत)
२) बोल्ट ऑडिओ झेड १५
अमेझॉनवर Boult Audio Z15 इअरबड्सची लिस्टेड किंमत २ हजार ९९९ रुपये आहे. मात्र त्यावर ६७ टक्के सूट मिळत असल्याने तुम्ही हे इअरबड्स ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हे इअरबड्स ३२ तासांचा प्लेटाईम देतात. इअरबड्समध्ये टच कंट्रोल आणि व्हॉइस असिस्टंट फीचर मिळतात. इअरबड्सना आयपीएक्स ५ वॉटर रेझिस्टंट रेटिंग मिळाली आहे.
३) झेब्रॉनिक्स साउंड बाँम्ब सेमी इअरबड्स
फ्लिपकार्टवर ‘Zebronics Sound Bomb 9 Semi Earbuds’ची लिस्टेड किंमत २ हजार ९९९ रुपये आहे. मात्र, त्यांच्यावर ६७ टक्के सूट मिळत असल्याने किंमत ९९९ रुपये झाली आहे. हे इअरबड्स १६ तासांचा प्लेटाईम देतात. इअरबड्समध्ये इएनसी कॉलिंग, व्हॉइस असिस्टंट, फ्लॅश कनेक्ट हे फीचर मिळतात. इअरबड्स स्प्लॅश प्रुफ आहेत.
(लाँच झाली Redmi K60 सिरीज, Wireless charging, १६ जीबी रॅमसह जबरदस्त फीचर्स, वाचा संपूर्ण माहिती)
४) पीट्रॉन बासबड्स
फ्लिपकार्टवर ‘pTron Bassbuds Perl In-Ear Earbuds’ची लिस्टेड किंमत ३ हजार १९९ रुपये आहे. मात्र, या इअरबड्सवर ६९ टक्के सूट मिळत असल्याने तुम्ही हे इअरबड्स ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ते कॉमपॅक्ट केससह २८ तासांचा प्लेबॅक टाईम देतात. इअरबड्समध्ये ट्रू टॉल्क इएनसी फीचर मिळते. इअरबड्समध्ये डीप बेस, लो लॅटन्सी स्टिरिओ कॉल अनुभवू शकता.
५) सिस्का सॉनिक बड्स
अमेझॉनवर ‘Syska Sonic Buds IEB 450’ची लिस्टेड किंमत २ हजार ४९९ रुपये आहे, मात्र या इअरबड्सवर ६४ टक्के सूट मिळत असल्याने तुम्ही ते ८९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हे इअरबड्स २० तासांचा प्लेबॅक टाइम देतात. इअरबड्समध्ये टॅप एन प्ले टच कंट्रोल फीचर मिळते. इअरबड्सना आयपीएक्स ४ वॉटर रेझिस्टेंट रेटिंग मिळाले आहे.