Apple products likely to launch in 2023 : अॅपलने या वर्षी अॅपल आयफोन १४ सिरीज लाँच केली. या सिरीजबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. १४ सिरीजसह अॅपलने फिटनेसप्रेमींसाठी आपल्या स्मार्टवॉच देखील सादर केल्या. त्याचबरोबर संगीत प्रमींसाठी इअरबड्स देखील लाँच केलेत. या वर्षीप्रमाणे पुढील वर्षीदेखील अॅपल काही विशिष्ट फीचर्ससह आपली उपकरणे लाँच करू शकते. कोणती आहेत ही उपकरणे? जाणून घेऊया.
१) १५ इंच मॅकबुक एअर
एम २ प्रोसेसरसह सध्याचा मॅकबुक एअर हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात सक्षम, पातळ आणि हलका नोटबुक आहे. कंपनी या मॅकबुकचा १५ इंच व्हेरिएंट २०२३ मध्ये लाँच करू शकते. यामध्ये मॅकबुक एअरसारखे डिजाईन आणि एम २ चिपसेट मिळू शकते. कार्यक्षमता वाढवण्यासाठी 15 inch MacBook Air मध्ये अॅक्टिव्ह कुलिंग सिस्टिम देखील मिळू शकते.
(सॅमसंग, असूसला फुटणार घाम; ९६ जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो ‘हा’ लॅपटॉप)
२) रिअॅलिटी प्रो व्हीआर हेडसेट
अॅपल Reality Pro VR headset लाँच करू शकते. हा जगातील सर्वात सक्षम स्टँडअलोन व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट असण्याची शक्यता आहे. हा हेडसेट जानेवरी २०२३ मध्ये लाँच होऊ शकतो आणि मेटा क्वेस्ट प्रोला टक्कर देण्यासाठी त्यामध्ये विविध फीचर्स असतील, असे म्हटल्या जाते.
३) अॅपल सिलिकॉनसह मॅक प्रो
अॅपल सिलिकॉन एम २ एक्सट्रिमसह Mac Pro लाँच करू शकते. यामध्ये ४० कोअर सीपीयू, १२८ कोअर जीपीयू आणि २५६ जीबी पर्यंत युनिफाईड मेमरी मिळण्याची शक्यता आहे. या फीचर्समुळे मॅकप्रो इतर मॅकच्या तुलनेत अधिक शक्तिशाली होईल.
(अमेझॉनवर बजेट इअरबड्स उपलब्ध, किंमत १ हजारांच्या आत, १० तासांपेक्षा अधिक प्लेटाईम, पाहा यादी)
४) एम ३ पावर्ड आयमॅक
अॅपल एम २ पावर्ड आयमॅक वगळून apple silicon m3 powered imac ऑल इन वन डेस्कटॉप संगणक ग्राहकांसाठी उपलब्ध करण्याची शक्यता आहे. या उपकरणाच्या डिजाईनबाबत अधिक माहिती नाही, मात्र ते सध्या उपलब्ध असलेल्या एमवन आयमॅकसारखा असू शकतो आणि विविध रंग पर्यायांमध्ये उपलब्ध होऊ शकतो.
५) स्क्रिनसह होमपॉड आणि अॅपल टीव्ही सपोर्ट
अॅपलचा आगामी HomePod अमेझॉन इको शोपासून प्रेरित असू शकतो. यामध्ये टच इनपूटसह मोठा डिस्प्ले मिळू शकतो आणि फेसटाईमसारखे फीचर वापरता येण्यासाठी त्यामध्ये वेब कॅमेरा मिळू शकतो. इतकेच नव्हे तर, पुढील पिढीच्या होमपॅडमध्ये अॅपल टीव्ही प्रमाणे कनेक्टिव्हिटीसाठी एचडीएमआय पोर्ट देखील मिळू शकतो. यामुळे होमपॅड मल्टी फंक्शनल होईल, ज्यामुळे युजरला चित्रपट, शो आणि अॅपल आर्केड सब्सक्रिप्शद्वारे गेम्स देखील खेळता येतील.
६) पुढील पिढीचा होमपॅड
डिस्प्ले असलेल्या होमपॉडसह अॅपल नियमित होमपॉड देखील लाँच करणार असल्याचे म्हटल्या जाते. हा होमपॉड अलिकडेच बंद करण्यात आलेल्या होमपॉडसारखा असेल आणि त्याची ऑडिओ क्षमता चांगली असेल. मार्क गुर्मननुसार नवीन होमपॉडमध्ये एस ८ चीप मिळू शकते आणि तो २०२३ च्या पहिल्या तिमाहीत सादर होऊ शकतो.