List Of Gadgets Stopped In 2022 : २०२२ मध्ये अनेक गॅजेट्स ग्राहकांच्या भेटीला आलेत. आयफोन १४, असूस झेनबुक १७ फोल्डसह अनेक गॅजेट्सचा यामध्ये समावेश होता. अनोख्या फीचर्समुळे हे गॅजेट्स चर्चेचा विषय ठरले. परंतु, काही टेक उत्पादने बंद देखील झालीत. ही उत्पादने आता खरेदी करता येणार नाहीत. कोणती आहेत ही उत्पादने? जाणून घेऊया.

१) माइक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर

Honda Nissan merger
होंडा, निस्सानचे ऐतिहासिक महाविलीनीकरण; ऑगस्ट २०२६ पर्यंत तडीस नेण्याचा निर्धार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
low budget superhit movies of 2024
Year Ender 2024: बजेट कमी असूनही गाजवले बॉक्स ऑफिस, यंदा प्रदर्शित झालेले ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
Survey of wetlands in Maharashtra State National Centre for Sustainable Coastal Management Report thane news
५६४ पाणथळींचे भवितव्य नव्या सरकारच्या हाती!
Why has fish production in Konkan decreased this year print exp
पाच वर्षांतला नीचांक… कोकणातील मत्स्य उत्पादन यंदा का घटले? निसर्गाइतकाच मानवही जबाबदार?
Top Tech Technologies Launched in 2024 in Marathi
Top Technologies in 2024: आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते सायबर सिक्युरिटी ‘या’ आहेत यंदाच्या टॉप १० टेक्नॉलॉजी
Top Auto Launched 2024 Year Ender
Top Auto Launched 2024 : महिंद्रापासून ते होंडापर्यंत… २०२४ मध्ये लाँच झाल्या ‘या’ पाच नवीन गाड्या, तुम्हाला कोणती आवडली सांगा?
Dattatreya Jayanti 2024
Datta Jayanti 2024: एकमुखी ते त्रिमुखी दत्तमूर्ती; सिंधू संस्कृती, वेद ते गुरुचरित्र त्रिमूर्तीचा विकास कसा झाला?

माइक्रोसॉफ्टचे इंटरनेट एक्सप्लोरर आता बंद झाले आहे. लोकांनी त्याचा भरपूर वापर केला, आता कंपनीने त्याऐवजी नवीन ब्राऊजर उपलब्ध केले आहे. इंटरनेट एक्सप्लोरर जवळपास २५ वर्षांपूर्वी लाँच करण्यात आले होते.

(Pen drive मध्ये पूर्ण स्टोअरेज का नाही मिळत? कमी का मिळते? जाणून घ्या त्यामागील रोचक कारण)

२) आयफोन मिनी

उत्तम फीचर्स आणि गुणवत्तापूर्ण कॅमेरामुळे आयफोन लोकांमध्ये लोकप्रिय आहे. २०२२ मध्ये अ‍ॅपलने आयफोन १४ सिरीज लाँच केली. ग्राहकांना नवीन फोन उपलब्ध करताना अ‍ॅपलने आपला बजट स्मार्टफोन आयफोन मिनी बंद केला आहे. आयफोन मिनीची किंमत नियमित आयफोनपेक्षा कमी होती, परंतु त्याच्या किंमतीत जबरदस्त अँड्रॉइड फोन्स उपलब्ध असल्याने त्याची विक्री कमी होती. यामुळे कंपनीने त्यास बंद केले.

३) आयपॉड टच

अ‍ॅपलने २०२२ मध्ये आयपॉड टच बंद केले. गाणी ऐकण्यासाठी हे लोकप्रिय गॅजेट होते. त्याची बॅटरी लाइफ १० तासांची होती आणि त्यात १००० गाण्यांचा सेट मिळत होता. आता म्युझिक स्ट्रिमिंग अ‍ॅपचा वापर वाढल्याने आणि मोबाइलमध्येही गाणी ऐकण्याची सोय आणि इतर फीचर्स असल्याने लोकांनी आयपॉड वापरणे बंद केले. या पार्श्वभूमीवर कंपनीने हे गॅजेट बंद केले.

(Spam Calls ओळखता येणार, गुगलचे नवीन फीचर ‘असे’ करते काम)

४) यूट्यूब गो

यूट्यूब गो अ‍ॅप २०१६ मध्ये लाँच झाले होते. २०२२ मध्ये हे अ‍ॅप गुगल सपोर्टवरून हटवण्यात आले. एंट्री लेव्हल डिव्हाइसची कामगिरी सुधारण्यासाठी कंपनीने हे अ‍ॅप बंद केले.

Story img Loader