Bank under rupees 2000 thousand : अलीकडे अनेक फोनमध्ये ४५०० किंवा ५ हजार एमएएचची बॅटरी मिळते. ही बॅटरी दीर्घकाळ चालते. मात्र फार काळ गेमिंग, चित्रपट, व्हिडिओ पाहताना ती टिकेल याची शक्यता कमी असते. तसेच तुम्ही लांब सहलीला चालले असाल किंवा प्रवासात असल्यास चार्जिंगची समस्या उद्भवते. अशात पावरबँक उपयुक्त ठरू शकते. मोबाईलची बॅटरी कमी झाल्यास पावरबँकने तुम्ही फोन चार्ज करू शकता आणि त्याचा पुन्हा वापर करू शकता. पावरबँक २००० हजार रुपयांच्या खाली आणि त्यावरील किंमतीमध्ये देखिल उपलब्ध आहे. २००० रुपयांखाली कोणते पावरबँक मिळतात याबाबत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१) अम्ब्रेन पावर बँक

‘Ambrane 20000mAh Power Bank’ची क्षमता अधिक असल्याने तुम्ही अनेक वेळा आपले डिव्हाइस चार्ज करू शकता. या पावरबँकद्वारे आयफोन १२ ४.६ वेळा, सॅमसंग एम ११ २.६ वेळा आणि आयपॅड १.४ वेळा चार्च करता येऊ शकतो, असा दावा अमेझॉन संकेतस्थळावर करण्यात आला आहे. पावरबँकमध्ये २० वॉट फास्ट चार्जिंग वैशिष्ट्ये मिळते. २ यूएसबी पोर्ट आणि १ टाइप सी पोर्ट आऊटपूटद्वारे हा पावरबँक ३ डिव्हाइसेस एकाचवेळी चार्ज करू शकतो. तसेच, या पावरबँकवर ६ महिन्यांची वॉरंटी देखील मिळत आहे. अमेझॉनवर या पावरबँकची किंमत १७९९ रुपये आहे.

(भारीच! ८ जीबी रॅम, अजून ५ जीबी वाढवू पण शकता, TECNO POVA 4 मध्ये आणखी काय आहे खास? जाणून घ्या)

२) अमेझॉन बेसिक्स फास्ट चार्जिंग पावर बँक

Amazon Basics 20000mAh Power Bank ओव्हरकरंट, ओव्हरव्होल्टेज आणि शॉर्ट सर्किटपासून सुरक्षित आहे. पावरबँकला चार्जिंग स्टॅटस दाखवण्यासाठी एलईडी इंडिकेटर्ससह काळी मेटॅलिक बॉडी मिळाली आहे. पावरबँकवर ६ महिन्यांची मॅन्युफॅक्च्युरर वॉरंटी मिळत आहे. हा १८ वॉट फास्ट चार्जिंग पावरबँक असून त्यात ट्रिपल आऊटपूट (टाइप सी, २ यूएसबी) आणि ड्युअल इनपूट (टाइप सी, मायक्रो यूएसबी) पोर्ट्स मिळतात. अमेझॉनवर या पावरबँकची किंमत १६४९ रुपये आहे.

३) कॉलमेट पावरबँक

Callmate 10000 mAh Li-Polymer Power Bank २२.५ वॉटपर्यंतचा आऊटपूट चार्ज सपोर्ट करतो. हा पावर बँक ३० मिनिटांत तुमचा फोन ७० टक्के चार्च करू शकतो. पावरबँक स्वत: २ ते ३ तासांत चार्ज होऊ शकतो. पावर बँकसोबत ३ इन १ केबल्सदेखील मिळतात. हा पावरबँक २ ते ३ वेळा तुमचा फोन चार्ज करू शकतो. पावरबँकमध्ये एलईडी डिजिटल डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. अमेझॉनवर या पावरबँकची किंमत १६९९ रुपये आहे.