Apple एक दिग्गज टेक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करत असते. नुकताच Apple WWDC २०२३ हा इव्हेंट पार पडला. यामध्ये कंपनीने अनेक नवीन उत्पादने सादर केली. सध्या apple चा MacBook Air M1 सर्वात परवडणारा मॅक आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या Amazon Apple डेज सेलमुळे तो अजून परवडणारा बनला आहे. amazon वर मॅकबुक एअर एम १ वर मर्यादित कालावधीसाठी डिस्काउंट मिळत आहे.

अ‍ॅपल मॅकबुक एअर एम १ सध्या अ‍ॅपल इंडिया या वेबसाईटवर खरेदीसाठी ९९,९९० रुपयांना उपलब्ध आहे. तसेच टेक जायंटने १५ इंचाचा मॅकबुक एअर एम २ wwdc २०२३ या इव्हेंटमध्ये लॉन्च केला आहे. त्यानंतर कंपनीने १३ इंचाच्या मॅकबुक एअर एम २ मध्ये ५,००० रुपयांची कपात केली आहे. तर M1 MacBook Air ची किंमत आहे तशीच ठेवण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडिया (gadgetsnow) ने दिले आहे.

sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे
Exports of the country crossed the mark of 800 billion dollars
देशाची निर्यात ८०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडेल!
Trump election impact on Tesla stocks
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय होताच एलॉन मस्क मालामाल; एका दिवसांत केली २६ अब्ज डॉलर्सची कमाई
Adulterated food pune, Food and Drug Administration pune, Diwali, Adulterated food,
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा लाखोंचा बाजार! पुणे विभागात दसरा, दिवाळीत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
three crores found in atm van
नालासोपार्‍यात एटीएम व्हॅन मध्ये आढळले साडेतीन कोटी रुपये, गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू

हेही वाचा : Xiaomi ने लॉन्च केले ‘हे’ भन्नाट इअरबड्स, ३० तासांची बॅटरी लाईफ आणि…, जाणून घ्या किंमत

तथापि सध्या सुरू असलेल्य्या विक्रीदरम्यान Apple MacBook M1 वर तब्बल २० हजार रुपयांची सूट मिळाली आहे. ज्यामुळे त्याची किंमत ७९,९९० रुपये झाली आहे. Amazon इंडिया वर मॅकबुक एअर एम १ च्या खरेदीवर ५ हजार रुपयांचा झटपट डिस्काउंट देत आहे. HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर देखील सूट मिळत आहे. या सर्व ऑफरमुळे मॅकबुक एअर एम १ ची किंमत ७४,९९० रुपये झाली आहे.

Apple MacBook Air M1 चे स्पेसिफिकेशन्स

मॅकबुक एअर एम १ मध्ये तुम्हाला १३.३ इंचाचा बॅकलिट रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यामध्ये IPS टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तसेच त्यात 7-core GPUचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये ८ जीबी रॅम असून ती १६ जीबी पर्यंत वाढवता येते. तसेच ७२० पी इतका फेसटाईम एचडी कॅमेरा वापरकट्यानं या मॅकबुकमध्ये मिळतो.