Macbook pro with 96 gb ram : आधुनिकता आणि नवीन फीचर्समुळे अॅपलची उपकरणे ग्राहकांना भुरळ घालतात. आयफोनसह मॅकबुकदेखील चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. मॅकबूक घेण्याच्या विचारात असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बेंचमार्किंग संकेतस्थळ असलेल्या गिगबेंचच्या लिस्टिंगवर अॅपलचे काही नवीन मॉडेल्स दिसून आले आहेत. या संकेतस्थळावरून आगामी मॅकबूक मॉडेल्सबाबत महत्वाची माहिती मिळाली आहे.
लिस्टींग असे सूचित करते की, आगामी मॅकबुक लॅपटॉपमध्ये अॅपलचे रिलीज न झालेले एम २ मॅक्स प्रोसेसर असेल. तसेच त्यामध्ये ९६ जीबी रॅम असेल. पण ते खरेच मॅकबूक प्रो आहे की नाही याबाबत पुष्टी झालेली नाही. लिस्टिंगमध्ये Mac14,16, असे नाव देण्यात आले आहे. या नावावरून हे उपकरण मॅकबुक प्रो किंवा पुढील पिढीचे मॅक स्टुडिओ असू शकते.
(४८,४९९ रुपयांत मिळवू शकता APPLE IPHONE 13, केवळ ‘हे’ करा)
अॅपलने अलिकडेच एम २ आणि एम २ प्रो प्रोसेसरसह १३ इंच मॅकबुक प्रो मॉडेल लाँच केले आहे. कंपनी नवीन चीपसह ‘मॅकबुक प्रो’चे नवीन मॉडेल लाँच करू शकते अशी अफवा आहे. विशेष म्हणजे, अॅपल कमी किंमतीच्या मॅकबूक मॉडेलसह एम २ मॅक्स चीप उपलब्ध करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे, गिकबेंचवर आढळलेला मॅकबुक प्रो हा मॅकबुक प्रो असू शकतो.
गेल्या वर्षी मोठ्या सुधारांसह मॅकबुक प्रो १४ आणि १६ इंच मॅकबूक प्रो मॉडेल लाँच झाले होते, त्यामुळे नवीन ‘मॅकबुक प्रो’च्या डिजाइनमध्ये काही बदल होण्याची शक्यता कमी आहे. जुन्या मॉडेल्समध्ये ३ थंडरबोल्ट ४ स्लॉट, एक एचडीएमआय पोर्ट, एक एसडीएक्ससी कार्ड स्लॉट आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक देण्यात आले आहे. नवीन मॉडेलही याच फीचर्ससह मिळण्याची शक्यता आहे.