देशात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. आता ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर माल पोहोचवण्यासाठी केला जात आहे. यामुळे दुर्गम भागातही मालाची डिलिव्हरी सहज करता येईल आणि वेळही कमी लागेल. काही दिवसांपूर्वीच बंगळूरुमध्ये एक अनोखा प्रयोग यशस्वी झाला होता. माहिती तंत्रज्ञान नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात ड्रोन्सच्या साहाय्याने औषधे पोहोचती करण्यात आली होती. या दृष्टीने भारतातील पहिले ड्रोन दोन वर्षांत येऊ शकते. हे ड्रोन ताशी १०० किलोमीटर वेगाने १५० किलोमीटरपर्यंत जाईल. तसेच १५० किलो माल वाहतूक करू शकेल. जिथे पॅकेज डिलिव्हर करण्यासाठी ७२ तास लागतो, तिथे आता ८ ते १२ तासात सामान वितरित केले जाऊ शकते. या मेड इंडिया ड्रोनचे नाव HL-150 आहे. ड्रोन न्यूजस्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीजने डिझाइन केले आहे. बेंगळुरू-आधारित स्टार्टअपने ड्रोन वितरण सेवेचा प्रयोग करण्यासाठी एअरलाइन स्पाइसजेटशी भागीदारी केली आहे. यासंदर्भात माहिती देताना न्यूजस्पेसचे सीईओ समीर जोशी म्हणाले की, डिझाइन पूर्णपणे अंतर्गत केले गेले आहे. कंपनी सरकारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत काम करत आहे.

HAL भारतीय हवाई दलासाठी मानवरहित हवाई वाहने (UAV) आणि लष्करासाठी ड्रोन तयार करते. ड्रोन १०० किमी प्रतितास वेगाने उड्डाण करेल. खराब हवामानातही चांगले उड्डाण करू शकेल. ड्रोनमध्ये प्रगत संगणकीय प्रणाली असून आर्टिफिशिअल इंटेलिजेस अल्गोरिदमद्वारे स्वतंत्र्यपणे संचालित होते. हा ड्रोन इलेक्ट्रिक मोटरद्वारे संचलित होते.

drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…
flyover constructed on Mumbra Panvel Highway at Kalamboli Circle become waiting bridge for heavy vehicles
कळंबोली सर्कलला कोंडीचा फेरा,मुंब्रा,पनवेल उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी प्रतीक्षापूल
Kandalvan Cell takes cognizance of complaint regarding flamingo drone filming Mumbai print news
फ्लेमिंगो ड्रोन चित्रिकरणाच्या तक्रारीची कांदळवन कक्षाकडून दखल
accident on Gowari flyover in Sitabardi involved 12 15 vehicle collisions
धक्कादायक! नागपुरातील बर्डी उड्डाण पुलावर १५ वाहने एकमेकांवर धडकली
Bird lovers expressed displeasure over filming flamingos with drones for Netflix Sikandar Ka Muqaddar movie
‘सिकंदर का मुकद्दर’ चित्रपटात फ्लेमिंगो पक्ष्यांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण, नवी मुंबईतील पक्षिप्रेमींची नाराजी

न्यूजस्पेसचे HL-१५० जगभरातील ई-कॉमर्स ऑपरेशन्ससाठी विकसित केल्या जाणाऱ्या इतर ड्रोनपेक्षा वेगळे आहे. सध्या, व्यावसायिक ड्रोन ऑपरेशन्स वापर १ ते ५ किलो वजनाच्या वस्तू त्याच्या गंतव्यस्थानावर वितरित केले जाते. भारतामध्ये १ डिसेंबर २०१८ पासून ड्रोनसंदर्भातील नियम अधिकृतरीत्या लागू करण्यात आले. तेव्हापासून सर्वसामान्यांना ड्रोन उडवण्याची परवानगी मिळाली. १५ जुलै २०२१ रोजी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली. त्यात ड्रोनसाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या कमी करण्यात आली. ड्रोन हे एक प्रकारचे मानवरहित विमानच असते. ते रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने उडवले आणि नियंत्रित केले जाते.

Story img Loader