देशात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. आता ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर माल पोहोचवण्यासाठी केला जात आहे. यामुळे दुर्गम भागातही मालाची डिलिव्हरी सहज करता येईल आणि वेळही कमी लागेल. काही दिवसांपूर्वीच बंगळूरुमध्ये एक अनोखा प्रयोग यशस्वी झाला होता. माहिती तंत्रज्ञान नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात ड्रोन्सच्या साहाय्याने औषधे पोहोचती करण्यात आली होती. या दृष्टीने भारतातील पहिले ड्रोन दोन वर्षांत येऊ शकते. हे ड्रोन ताशी १०० किलोमीटर वेगाने १५० किलोमीटरपर्यंत जाईल. तसेच १५० किलो माल वाहतूक करू शकेल. जिथे पॅकेज डिलिव्हर करण्यासाठी ७२ तास लागतो, तिथे आता ८ ते १२ तासात सामान वितरित केले जाऊ शकते. या मेड इंडिया ड्रोनचे नाव HL-150 आहे. ड्रोन न्यूजस्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीजने डिझाइन केले आहे. बेंगळुरू-आधारित स्टार्टअपने ड्रोन वितरण सेवेचा प्रयोग करण्यासाठी एअरलाइन स्पाइसजेटशी भागीदारी केली आहे. यासंदर्भात माहिती देताना न्यूजस्पेसचे सीईओ समीर जोशी म्हणाले की, डिझाइन पूर्णपणे अंतर्गत केले गेले आहे. कंपनी सरकारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत काम करत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा