Made In Tata iPhone : टाटा ग्रुप भारतात आयफोन बनवण्याच्या तयारीत असून, टाटा कंपनी अ‍ॅपल आयफोन बनवणारी पहिली कंपनी बनू शकते. टाटा ग्रुपचा अ‍ॅपलबरोबरचा करार लवकरच प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे. अ‍ॅपल फोन बनवण्‍यासाठी भारतात सध्या तीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत, ज्यात विस्ट्रॉन, पेगाट्रॉन आणि फॉक्सकॉन यांचा समावेश आहे. Apple आधीपासूनच भारतात iPhone 13, iPhone 12 आणि iPhone SE सह अनेक iPhones तयार करते. टाटा समूह एका प्रमुख अ‍ॅपल आयफोनचा पुरवठादार कारखाना विकत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. टाटा आणि अ‍ॅपलच्या या करारावर ऑगस्ट २०२३ पर्यंत शिक्कामोर्तब केले जाऊ शकते. टाटा आणि अ‍ॅपलमधला हा करार प्रत्यक्षात उतरल्यास तो भारतासाठीही महत्त्वाचा टप्पा असेल, कारण स्थानिक भारतीय कंपनी पहिल्यांदाच आयफोन निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश करणार आहे, असाही ब्लूमबर्गच्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Samsung Galaxy M34 5G Vs iQOO Neo 7 Pro 5G: कॅमेरा, बॅटरी आणि फीचर्समध्ये कोणता स्मार्टफोन्स ठरतो बेस्ट? किंमत फक्त…

टाटाच्या अधिग्रहणाचे लक्ष्य कर्नाटक राज्यातील दक्षिणेकडील विस्ट्रॉन कारखाना आहे. अहवालानुसार, ६०० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त मूल्याचा करार करणे हा जवळपास वर्षभराच्या वाटाघाटींचा परिणाम आहे. हा कारखाना आयफोन १४ मॉडेलच्या निर्मितीसाठी ओळखला जातो. सध्या हा कारखाना १०,००० पेक्षा जास्त व्यक्तींना रोजगार देतो. विशेष म्हणजे टाटा समूह विस्ट्रॉन कॉर्पचे हेच कर्नाटकातील उत्पादन युनिट खरेदी करू इच्छितो. अॅपलचा आयफोन या युनिटमध्येच तयार केला जातो. हा करार जवळपास ५००० कोटींचा असल्याची चर्चा आहे. टाटा विस्ट्रॉन आणि अॅपलने अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारतात नवीन लाँच केलेल्या iPhone १४ चे उत्पादन चेन्नईतील Foxconn च्या श्रीपेरुम्बुदुर कारखान्यातून करेल, अशी अलीकडे Apple ने घोषणा केली होती. आम्ही आयफोन १४ भारतात तयार करण्यास उत्सुक आहोत. नवीन iPhone १४ हा नवे तंत्रज्ञान आणि गंभीर सुरक्षा क्षमतांनी सुसज्ज आहे. भारतात सध्या iPhone १४ ची निर्मिती Pegatron आणि Foxconn येथे केली जात आहे, असंही कंपनीने जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : VIDEO: रिअलमीने भारतात लॉन्च केले ‘हे’ दोन स्मार्टफोन्स; डिस्काउंट मिळवायचा असल्यास…

अ‍ॅपलला होणार फायदा

भारतात आयफोन बनवल्यास अ‍ॅपललाच त्याचा जास्त फायदा होणार आहे. कारण चीनपासून वेगळं होतं भारतात उत्पादन वाढवणे आणि भारतातील तंत्रज्ञानाचा आयफोन बनवताना वापर करणे अॅपलला शक्य होणार आहे. ३० जूनच्या तिमाहीत विस्ट्रॉनने भारतातून जवळपास ४११७ कोटी रुपयांच्या आयफोनची निर्यात केली आहे. तसेच अ‍ॅपलचे दुसरे प्रमुख उत्पादक तैवानची फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप आणि पेगाट्रॉन कॉर्पही आपापल्या पातळीवर उत्पादन वाढवत आहेत. विशेष म्हणजे १५५ वर्षे जुना टाटा समूह मिठापासून तंत्रज्ञानापर्यंत सर्व काही बनवतो आणि विकतो. गेल्या काही वर्षांत समूहाने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने आणि ई-कॉमर्समध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे, जे टाटा समूहासाठी एक नवीन क्षेत्र आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Made in tata iphone tata group to make iphone in india a plant will be set up in karnataka vrd
Show comments