Maharashtra to give free land to bsnl : राज्यातील ग्रामीण भागाला चांगली इंटरनेट सुविधा मिळावी यासाठी राज्य सरकारने मंगळवारी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार २०० चौरस मीटर जमीन सरकारच्या मालकीची भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) या कंपनीला टॉवर उभारण्यासाठी मोफत देणार आहे.
ही जमीन राज्यातील २ हजार ३८६ गावांमध्ये पसरलेली आहे. मंगळवारी कॅबिनेटची बैठक झाली होती, त्यात ही जमीन मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी एका निवेदनातून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली. यात जमीन राज्याच्या महसूल विभागाकडून मोफत उपलब्ध करून दिली जाणार. सरकार बीएसएनएलला या प्रकल्पासाठी मोफत वीजही देणार, असे सांगण्यात आले आहे.
(‘PTRON’ने सादर केला जबरदस्त नेकबँड, सिंगल चार्जवर ६० तासांच्या बॅटरी लाइफचा दावा, किंमत केवळ..)
बीएसएनएलसोबत समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकारी हे प्रभारी असतील, असे देखील निवेदनातून सांगण्यात आले आहे. या योजनेत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.